05 April 2020

News Flash

काळा तलाव महोत्सवात ‘विचारांचे-सूर’

स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक हे सर्व युगपुरुष होते. एक विचार या महापुरुषांनी देशासह जगाला दिला. त्यामुळे आपण स्वतंत्र झालो.

| January 16, 2013 01:38 am

स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक हे सर्व युगपुरुष होते. एक विचार या महापुरुषांनी देशासह जगाला दिला. त्यामुळे आपण स्वतंत्र झालो. मात्र सध्याची परिस्थिती पाहता पुन्हा एक सामाजिक वैचारिक क्रांती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद पै यांनी येथे केले. याचवेळी प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी एकापेक्षा एक रसिकांना खुलविणारी दिलखेचक गाणी सादर करून उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले.
दोन दिवसांच्या काळा तलाव महोत्सवात एकाच व्यासपीठावर विचार आणि स्वरसुरांची मैफल जमली होती. या महोत्सवाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. विवेकानंदांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. शाळकरी विद्यार्थी उत्साहाने यात्रेत सहभागी झाले होते. काळा तलावाच्या काठी हुडहुडय़ा थंडीत आयोजित महोत्सवाला संवेदना ट्रस्टचे दीपक ब्रीद, प्रवीण देशमुख उपस्थित होते.
जीवनात बदल घडविण्यासाठी विचारात बदल होणे आवश्यक आहे. सकारात्मक विचार हा सामाजिक बदलातील महत्त्वाचा प्रवाह आहे. स्वामी विवेकानंदांनी वडिलांकडे टांगेवाला होण्याची इच्छा प्रकट केली. त्यावेळी नाउमेद न होता वडिलांनी बिनधास्त हो, पण त्या टांग्याचे श्रीकृष्णासारखे सारथ्य कर असा उपदेश केला. या विचारसरणीचा अवलंब होण्याची गरज आहे, असे पै यांनी सांगितले.
या कार्यक्रमानंतर गायिका वैशाली सामंत यांनी सदाबहार गीते सादर करून रसिकांना उत्साहित केले. गाण्यांचा कार्यक्रम होत असताना बोटीतून फेरी मारणारे प्रवासी या कार्यक्रमाचा स्वाद लुटत होते.
मायेच्या हळव्या, ऐका दाजीबा, डिपांग डिपांग, नदीच्या पल्याड अशी मराठी, हिंदी गाणी गाऊन महोत्सव एका टीपेला नेला. पतंग महोत्सवात नागरिक उत्साहाने सहभागी झाले  होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2013 1:38 am

Web Title: thinking musical beats in kala talav mahotsav
Next Stories
1 डोंबिवलीत शतचंडी याग
2 विवेकानंद जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य शोभा यात्रा
3 वाहतूक पोलिसांचा ‘हट्ट’ नडला!
Just Now!
X