लावणी क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेबद्दल अकलूजच्या सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या नावाने पुरस्कार यंदाच्या वर्षी प्रसिध्द लावणी कलावंत शकुंतला नगरकर यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे यंदाचे चौदावे वर्ष आहे. येत्या १८ ते २० जानेवारीदरम्यान अकलूजमध्ये आयोजिलेल्या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेत शकुंतला नगरकर यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
२१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदाच्या पुरस्काराची घोषणा संयोजक जयसिंह मोहिते-पाटील यांनी केली.
यापूर्वी यमुनाबाई वाईकर, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, गुलाबबाई संगमनेरकर, रोशन सातारकर, विठाबाई नारायणगावकर, कमलबाई जाधव-परभणीकर, राजश्री नगरकर, मधू कांबीकर, सुलोचना चव्हाण, सरला नांदुरेकर, ज्ञानोबा उत्पात आदी लावणी कलावंतांना सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील लावणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यंदाच्या पुरस्कार मानकरी शकुंतला नगरकर या वयाच्या चौदाव्या वर्षांपासून लावणी क्षेत्रात कार्यरत असून त्यांना त्यांच्या आई छबुबाई नगरकर यांच्यापासून लावणी कलेचा वारसा मिळाला आहे. त्यांना लावणी क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेबद्दल यापूर्वी नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीच्या वतीने तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
 

Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान
Vijay Bhatkar
डॉ. विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर