04 July 2020

News Flash

इंधन भेसळ करणाऱ्या त्रिकूटाला अटक

टॅंकरमधील फर्निश तेल चोरून इंधनभेसळ करणाऱ्या त्रिकूटाला उरण पोलिसांनी बुधवारी अटक केली.

| January 17, 2014 08:02 am

टॅंकरमधील फर्निश तेल चोरून इंधनभेसळ करणाऱ्या त्रिकूटाला उरण पोलिसांनी बुधवारी अटक केली. पोलिसांनी या त्रिकूटाच्या ताब्यातील पाच टॅंकरही जप्त केले आहेत.
जेएनपीटी बंदरातून विविध प्रकारचे रसायनीक पदार्थ,तसेच डिझेल,पेट्रोल,केरोसिन,खाद्यतेल याची आयात केली जाते.आयात केलेले आजुबाजूच्या परिसरात टाक्यांमध्ये साठवले जाते. त्यानंतर टँकरद्वारे देशभर वितरत केले जाते.  
बुधवारी गस्तीवरील पोलिसांना जासई येथील शंकर मदीर परिसरात फíनश तेलाने भरलेले तीन टँकर, एक पाण्याने भरलेला व एक अर्धा रिकामा असे एकूण पाच टँकर संशयास्पद रित्या उभे केल्याचे आ ढळून आले. याबाबत पोलिसांनी टॅंकर चालकांकडे विचारणा केली असता इंधन चोरीचा प्रकार उघडकीस आला.या आरोपींनी पाचशे लिटर ऑईल चोरी केल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी रशिद अहमद हमीद शेख(35),प्रविण कुमार नंदलाल सिंग(38) व दयानंद रामबली यादव(36)अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असल्याची  माहिती उरण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक एस.डी.सावंत यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2014 8:02 am

Web Title: three areested in fuel adulteration
टॅग Uran
Next Stories
1 थत्ते मैदानातील ३८ गुंठा मूळ मालकाला
2 सिडकोची घरे विक्रीसाठी तयार
3 जेएनपीटीचे नवे विकास पर्व
Just Now!
X