कापसाच्या १०० गाठी माल घेऊन जाणाऱ्या ट्रकसह बेपत्ता झालेल्या चालकाच्या तीन साथीदारांना चोपडा पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील विठ्ठलदास गोवर्धनदास जिनर्समधून १३ ते १६ एप्रिल या कालावधीत कापसाच्या १०० गाठी चालक इम्रान हा मालमोटारीतून अहमदाबाद येथील अरविंद मिलमध्ये पोच करण्यासाठी निघाला होता. परंतु ठराविक वेळेत माल पोच न झाल्याने चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक डी. डी. गवारे, शामकांत सोमवंशी हे संशयितांच्या शोधात होते. मोबाईलवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे पहूर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने नाकाबंदी केली असता एका टाटा सफारीचा त्यांना संशय आला. या वाहनातील सुभाष नन्नावरे, विकास गोरे, सागर शिंदे (सर्व राहणार श्रीरामपूर) यांना वाहनासह ताब्यात घेण्यात आले. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना २९ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. तीन संशयित सापडले असले तरी इम्रान व माल भरलेला ट्रक अद्याप मिळालेला नाही.

murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द