सोलापूर शहर व जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार यादी शुद्धीकरण प्रक्रियेत सुमारे तीन लाख बनावट मतदार वगळण्यात आले. यात सर्वाधिक मतदार सोलापूर शहर मध्य, शहर उत्तर व सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील आहेत.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक ६८ हजार ७९३ बनावट मतदार आढळून आले तर त्या खालोखाल ५४ हजार ३८२ बनावट मतदार शहर उत्तर मतदार संघातील आहेत. सोलापूर दक्षिणमध्ये ३५ हजार १२१ बनावट मतदार आढळून आले. या तीन विधानसभा मतदार संघांतील बनावट मतदारांची संख्या एक लाख ५८ हजारांपेक्षा अधिक होते.
जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून मतदार यादी शुद्धीकरण प्रक्रिया राबविण्यात आली असता त्यात २९ लाख ९० हजार, ४६ हजार एवढे मतदार दिसून आले. यापकी २७ लाख ८७ हजार ३५१ मतदारांची छायाचित्रे उपलब्ध होऊ शकली. उर्वरित दोन लाख २६०५ मतदारांकडून छायाचित्रे जमा करण्यात येणार आहे. मृत, स्थलांतरित, दुबार, बेपत्ता अशी मतदारांची वर्गवारी करून एकापेक्षा अधिक ठिकाणी असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात आली.
वगळण्यात आलेल्या बनावट मतदारांची विधानसभा मतदार संघनिहाय संख्या अशी – पंढरपूर- मंगळवेढा- २५ हजार ४२, मोहोळ राखीव-१५ हजार ९१, माढा-१० हजार ६९२, अक्कलकोट-१६ हजार ९८६, सांगोला- १६ हजार ८४९, माळशिरस- १८ हजार ७६६, करमाळा- १३ हजार १५, बार्शी-१७ हजार ७५९.