News Flash

देशव्यापी संपात औरंगाबादच्या तीन लाख कामगारांचा सहभाग

कंत्राटी कामगारांना आठ तासांसाठी १० हजार रुपये किमान वेतन द्यावे, वेगळा महागाई भत्ता द्यावा तसेच कायम करावे आदी विविध मागण्यांसाठी २० व २१ फेब्रुवारीला देशव्यापी

| February 14, 2013 12:39 pm

कंत्राटी कामगारांना आठ तासांसाठी १० हजार रुपये किमान वेतन द्यावे, वेगळा महागाई भत्ता द्यावा तसेच कायम करावे आदी विविध मागण्यांसाठी २० व २१ फेब्रुवारीला देशव्यापी संप होत आहे.
संपात औरंगाबाद जिल्ह्य़ातील ३ लाख कामगार, कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने पत्रकान्वये दिली.संप यशस्वी करण्यासाठी समितीतर्फे औद्योगिक परिसरात द्वारसभा घेऊन पत्रके वाटण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, बीएसएनएल कर्मचारी यांची सभा घेण्यात आली. शुक्रवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता तापडिया नाटय़मंदिर येथे निर्धार मेळावा आयोजित केला असून, ज्येष्ठ कामगार नेते र. ग. कर्णिक, अशोक थूल, डी. एल. कराड आदी नेते मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. उद्धव भवलकर, रंजन राणी, डॉ. महाआळणकर, जरारे, उमेश कुलकर्णी, के. एन. झा यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 12:39 pm

Web Title: three lakhs workers of aurangabad will participating in national level strick
टॅग : Aurangabad
Next Stories
1 सराफांकडे गहाण ठेवलेले चोरीचे ३४ तोळे सोने जप्त
2 ‘फूट पाडणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे’
3 महिलेचे गंठण पळविणाऱ्या दोघांना न्यायालयीन कोठडी