07 March 2021

News Flash

धनादेश न वटल्याने तीन महिने कारावास

वैयक्तिक अडचणीपोटी हातउसने घेतलेली रक्कम परत करण्यास दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस ३ महिने साधा कारावास ठोठावतानाच अडीच लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश लातूरच्या

| May 10, 2013 01:03 am

वैयक्तिक अडचणीपोटी हातउसने घेतलेली रक्कम परत करण्यास दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस ३ महिने साधा कारावास ठोठावतानाच अडीच लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश लातूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला.
फिर्यादी सिद्धेश्वर सखाराम सूर्यवंशी (मुरूड) यांनी गणपत नामदेव भोसले (मुरूड) यांना १२ जानेवारी २०११ रोजी १ लाख ४० हजार रुपये रक्कम हातउसनी दिली होती. आरोपीने फिर्यादीस १५ जून २०११ या तारखेचा धनादेश दिला. दोन महिन्यानंतर रक्कम देऊन धनादेश परत घेऊन जा, असे फिर्यादीने वारंवार सांगूनही रक्कम मिळाली नाही. नंतर फिर्यादीने बँक खात्यावर धनादेश भरला. परंतु तो वटला नाही. यानंतर विहित मुदतीत वकिलामार्फत नोटीस पाठवूनही आरोपीने धनादेशाची रक्कम परत केली नाही. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३च्या कलम २५५ (२) प्रमाणे चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम १३८नुसार आरोपीस दोषी ठरविले.
फिर्यादीचे वकील अ‍ॅड. विजय कलंदर यांनी केलेला युक्तिवाद व साक्षीपुरावे ग्राहय़ धरीत न्यायालयाने शिक्षा सुनावली. तीन महिने साधा कारावास व नुकसानभरपाई म्हणून एक महिन्यात अडीच लाख रुपये द्यावेत, असा आदेश न्या. संजय मुळीक यांनी दिला. यात कसूर केल्यास आणखी ३० दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2013 1:03 am

Web Title: three months prisonment due to cheque bounce
Next Stories
1 शेतकरी कर्जमुक्ती समितीची १३ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयांपुढे निदर्शने
2 जायकवाडीच्या पाण्याला ‘ब्रेक’!
3 अर्धवट रस्त्याच्या कामासाठी आमदार जाधव यांचे उपोषण
Just Now!
X