डॉकयार्ड रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ वरील अडचणीची ठरलेली तिकीट खिडकी अखेर रेल्वे स्थानकातील तिकीट घरामध्ये स्थलांतरित करण्यात ‘एनआरएमयू’ला यश आले  आहे. पुलावर असलेल्या या स्थानकाखाली एक तिकीट घर पूर्वीपासूनच होते. मात्र त्यानंतर शिवडीच्या दिशेने फलाट क्रमांक एकच्या टोकाला नवीन तिकीट घर उभारण्यात आले. या तिकीट घरात दोन खिडक्या असल्या, तरी प्रत्यक्षात एकच कर्मचारी असायचा. मात्र तेथे प्रसाधनगृह नसल्याने कर्मचाऱ्याला तिकीट घर सोडून जावे लागत होते. तसेच प्रवाशांनाही तिकीट काढण्यासाठी स्थानकावर चढून यावे लागत होते. ‘एनआरएमयू’चे महामंत्री वेणु नायर, वाडीबंदर शाखा सचिव अजय सुर्वे आदींनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.