08 March 2021

News Flash

आता वाघांचीही सफारी

स्वांतत्र्य प्रत्येकाला मानवतेच, असे नाही. विशेषत आठवत असल्यापासून िपजऱ्यामध्येच राहिलेल्या प्राण्यांना तर ते त्रासदायकच वाटते.

| January 7, 2015 07:25 am

स्वांतत्र्य प्रत्येकाला मानवतेच, असे नाही. विशेषत आठवत असल्यापासून िपजऱ्यामध्येच राहिलेल्या प्राण्यांना तर ते त्रासदायकच वाटते. त्यातच तो प्राणी ‘वाघ’ असला तर त्याला मुक्त करणाऱ्या वनाधिकाऱ्यांचाही श्वास रोखला जातो. मात्र संजय गांधी उद्यानात नुकताच हा प्रयोग यशस्वी झाला आणि वाघासोबत वनाधिकाऱ्यांनीही मोकळ्या हवेत श्वास घेतला.
त्याचे झाले असे की पर्यटकांना वाघ व सिंह पाहता यावेत यासाठी बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात व्याघ्र व सिंह सफारी आखली जाते. या दोघांसाठी वेगळी कुंपणे आहेत. वाघांचे कुंपण काही ठिकाणी तुटल्याने गेली दहा वष्रे ‘व्याघ्र सफारी’तील नऊ वाघ छोटय़ा िपजऱ्यात बंदिस्त होते. मात्र बाह्यकुंपणाची दुरुस्ती विलंबाने का होईना, पूर्ण झाली आणि आता वाघांना फिरण्यासाठी पुन्हा मोठा परिसर उपलब्ध झाला. अर्थात एवढी वष्रे िपजऱ्यात बंदिस्त असलेल्या वाघांना मोकळ्या परिसरात एकदम सोडणे शक्य नाही. त्यामुळे आधी नऊपकी एका वाघाला ‘पलाश’ला त्याच्या िपजऱ्यातून बाहेर काढण्याचा निर्णय झाला. िपजऱ्याचा दरवाजा उघडल्यावर सुरुवातीला ‘पलाश’ काहीसा गांगरला, मात्र त्यानंतर त्याने बाहेर येऊन परिसर न्याहाळायला सुरुवात केली. बाजूच्या झाडाच्या खोडावर पंजेही घासले आणि थोडे दूर जाऊन तलावातील पाण्यात डुबकीही मारली. बारा वर्षांचा पलाश बाहेरच्या परिसरात मोकळेपणाने फिरू लागल्याने सर्वानीच निश्वास सोडला.. लवकरच इतर आठ वाघांनाही िपजऱ्याबाहेर आणले जाणार आहे.
बिबटय़ांच्या मृत्यूंमुळे गेले काही महिने सतत चच्रेत राहिलेल्या बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बछडय़ांच्या आगमनानंतरही आणखी एक चांगली घटना घडली आहे. ‘व्याघ्र सफारी’च्या काही ठिकाणी तुटलेल्या कुंपणामुळे गेली दहाहून अधिक वष्रे वाघांना छोटय़ा पिंजऱ्यात राहावे लागत होते. उद्यानात येणारे पर्यटक तसेच आदिवासी पाडय़ांमध्ये वाघ जाण्याची भीती लक्षात घेऊन खबरदारी घेण्यात आली तरीही त्यासाठी वाघांना स्वतचे स्वातंत्र्य गहाण टाकावे लागले होते. आता मात्र पुन्हा एका मर्यादित स्वातंत्र्यात फिरण्याची वाट मोकळी झाली आहे.
सफारीमध्ये सर्व वाघांना एकत्रित सोडता येणार नाही. प्रत्येक वाघाला एकएकटे सोडून त्याचे निरीक्षण केले जाईल. स्वभाव लक्षात घेऊन दोन वाघांना एकत्रित सोडण्याचाही प्रयोग करता येईल. मात्र त्यासाठी वेळ लागेल. सध्या पलाश या वातावरणात रमतो आहे, ही सकारात्मक घटना आहे, असे मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2015 7:25 am

Web Title: tiger safari in mumbai
Next Stories
1 ‘सेल्फी’ने हजेरी
2 अग्निशमन दलातील अधिकारी पोलिसी चौकशीच्या फेऱ्यात
3 मुंबईत लोककलांचा परंपरा महोत्सव
Just Now!
X