खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तात्काळ पीककर्ज मिळावे, यासाठी सरकारने बीड जिल्हय़ास २०० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
राष्ट्रीयीकृत बँकांना कर्जाचे उद्दिष्ट वाढवून द्यावे, जिल्हा बँकेला मदत करावी, यासाठी मुंबईत बठक घेऊन मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली. बीड जिल्हा बँक आधीच दिवाळखोरीत निघून बंद पडली, तर राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास उत्सुक नाहीत. या पाश्र्वभूमीवर खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे, यासाठी पालकमंत्री क्षीरसागर यांची गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूलमंत्री हर्षवर्धन पाटील, नूतन राज्यमंत्री सुरेश धस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बठक झाली.