News Flash

आज ठाणे शहरात पाणी नाही

उल्हास नदीतील पाणी साठय़ाच्या नियोजनाकरिता कळवा लघु पाटबंधारे विभागाकडून १४ टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याने स्टेम पाणी पुरवठा कंपनीकडून होणारा पाणी पुरवठा दर बुधवारी

| November 27, 2012 11:44 am

उल्हास नदीतील पाणी साठय़ाच्या नियोजनाकरिता कळवा लघु पाटबंधारे विभागाकडून १४ टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याने स्टेम पाणी पुरवठा कंपनीकडून होणारा पाणी पुरवठा दर बुधवारी बंद राहाणार आहे. त्यामुळे येत्या बुधवार २८ नोव्हेंबर,सकाळी ९ ते गुरुवार २९ नोव्हेंबर, सकाळी ९ या कालावधीत (शटडाऊन  कारवाई असणार आहे) पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत ठाणे शहर, सिद्धेश्वर, महागिरी, ऋतू पार्क, उथळसर, नौपाडा, वृंदावन, श्रीरंग, पाचपखाडी, चरई, कळवा, खारेगाव, रेतीबंदर व मुंब्रा येथील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच या शटडाऊनमुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2012 11:44 am

Web Title: today there is no water in thane city
टॅग : Thane
Next Stories
1 ठाणे जिल्ह्य़ातील पाणीसंकट होणार अधिक बिकट
2 ऊर्जा संवर्धनात ठाणे शहर अव्वल
3 गोखले-रहाळकर शाळेच्या शिक्षकांचे आता शासनाला साकडे
Just Now!
X