उन्हाळ्यात शाळांना सुटय़ा असल्या तरी प्रचंड उकाडय़ात, लोडशेडिंग आणि पाणीटंचाईचा सामना करीत प्रवासाला जाणे आता बहुतेकांना जिकिरीचेच वाटू लागले आहे. स्वाभाविकच दिवाळीपासून वर्षांअखेपर्यंत पर्यटनाला निघण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढले आहे. डिसेंबरचा शेवटचा आठवडा या पर्यटन हंगामाचा अगदी उत्कर्षबिंदू! लेह, श्रीनगर, नैनीताल, सिमला ते थेट कन्याकुमारी, उटी, कोडाईकॅनाल आणि आपल्या आसपास अलिबाग, नागाव, इगतपुरी, माथेरानपासून ताडोबा, चिखलदरा.. सगळीकडे अगदी हाऊसफुल्ल आहे. अर्थात त्यामुळे पर्यटनाला जाण्याच्या मुंबईकरांच्या उत्साहावर किंचितही विरजण पडलेले नाही. मुंबईकरांच्या या ‘टुरटुर’चा लेखाजोखा!