महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सिडको व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाटुरिझम महामंडळ मर्यादितची स्थापना करण्यात आली आहे.
उपक्रमांतर्गत नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी सीबीडी बेलापूर येथील अर्बन हाटमध्ये महाटुरिझमच्या वतीने नवीन आरक्षण कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या आरक्षण कार्यालयामुळे नवी मुंबईकरांना सुट्टीमध्ये महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करणे सुलभ होणार आहे. महाटुरिझमच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास व पंरपरा जाणून घेण्याची व सृष्टीसौंदर्य व ऐतिहासिक वास्तू पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या आरक्षण कार्यालयामार्फत एमटीडीसी व इतर राज्यांतील पर्यटन विभागाची निवासस्थाने शासनमान्य दरांमध्ये आरक्षित करण्याची सुविधा मिळणार आहे. सध्या शहापूर येथील दीर्घायू फार्मसच्या वतीने पर्यावरण सहलीचे आयोजन केले जाते. सदर आरक्षण कार्यालय दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले असणार आहे. अधिक माहितीसाठी ०२२-२७५८०३४७ या क्रमांकावर संपर्क साधवा.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 2, 2015 2:40 am