News Flash

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतुकीत बदल

गणेश विसर्जन मिरवणुकांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठाणे वाहतूक शाखेने यंदाही ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या प्रमुख शहरांमधील मिरवणूक आणि विसर्जन घाट

| September 6, 2014 01:25 am

गणेश विसर्जन मिरवणुकांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठाणे वाहतूक शाखेने यंदाही ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या प्रमुख शहरांमधील मिरवणूक आणि विसर्जन घाट मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली असून येत्या ८ सप्टेंबरला एक दिवसासाठी हा वाहतूक बदल लागू असणार आहे. तसेच मिरवणूक मार्गापासून १०० मीटपर्यंत वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
ठाणे शहरातील मासुंदा तलाव (तलावपाळी) येथील विसर्जन घाटावर भक्तांची मोठी गर्दी असते. त्यामुळे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय, कोर्टनाका, जांभळीनाका आणि शिवाजी पथ येथून वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली असून या मार्गावरील वाहने बाजारपेठ, गोखले रोड मार्गे वळविण्यात आली आहे. तसेच गणेश विसर्जनासाठी आलेल्या वाहनांना टॉवर नाका ते मुस चौक दरम्यान उभी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ठाणे परिवहनच्या बसगाडय़ा सिडको स्टॅण्ड आणि ठाणे पूर्व स्थानकातून सोडण्यात येणार आहेत. मॉडेला चेक नाका मार्गे तीनहात नाका येथे वळण घेऊन जाणाऱ्या बस गाडय़ांना मॉडेला चेक नाका येथून प्रवेश बंद करण्यात आला आहे. मॉडेला चेक नाका ते वागळे इस्टेट रोड नं. १६ या मार्गावर वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून ही वाहतूक अंतर्गत मार्गावरून वळविण्यात आली आहे. सं.गो.बर्वे मार्ग, शांताराम चव्हाण मार्ग, रोड नं. २२ सर्कल ते इंदिरानगर नाका आणि इंदिरानगर नाका ते नितीन जंक्शन या मार्गावर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. विटावा जकात नाका, गोल्डन डाइज नाका, खारेगाव टोलनाका, शिळफाटा येथून जड- अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गे वळविण्यात आली आहे.
भिवंडी शहरातील सुताळआळी नाका, हनुमान बावडी मिरॅकल मॉल, केशरबाग नाका, अंजुरफाटा येथून वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच टीएमटी व एसटीच्या बसगाडय़ा आणि हलक्या वाहनांना नारपोली पोलीस ठाणे येथून प्रवेश बंद करण्यात आला आहे. रांजनोली नाका येथून भिवंडी शहरात येणाऱ्या सर्व वाहनांना तसेच एसटी, केडीएमटी बसगाडय़ांना साईबाबा जकात नाका येथून प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पारोळफाटा (नदीनाका), गोल्डन डाइज नाका, धामणगाव जांबोळी पाइपलाइन नाका व चाविंद्रा जकात नाका येथून वाहनांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच शहरातील मिरवणुकीच्या मार्गावर दोन्ही बाजूस वाहने, हातगाडी आणि टांगे उभे करण्यास मनाई करण्यात आली आहे. कल्याण शहरातील सुमारे ३१ विसर्जन मार्गावर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून पर्यायी मार्गे ही वाहतूक वळविण्यात आली आहे. उल्हासनगर येथील शास्त्री चौक ते हिराघाट तसेच पवई चौकाकडून हिराघाट डर्बी चौक येथून वाहनांना ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली असून विसर्जन मिरवणूक मार्गावर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 1:25 am

Web Title: traffic diversions in thane for ganpati idol immersion
Next Stories
1 जरा थांबा.. मार्केट थंडा है!
2 डोंबिवलीच्या टिळकनगरमध्ये लोकमान्यांना अभिप्रेत उपक्रमांचा वारसा..
3 काडीमोड घेतलेली गावे पुन्हा कल्याण-डोंबिवलीत?
Just Now!
X