गणेशोत्सव काळातील गर्दी व गणेश विसर्जन मिरवणूक यामुळे शहरातील काही रस्ते आजपासून बुधवारी (दि. १८) मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. काही रस्त्यांवर रोज सायंकाळ ते मध्यरात्रीपर्यंत वाहनांसाठी प्रवेश बंदही करण्यात आले आहेत. या काळात १२ ठिकाणे पार्किंगची म्हणून घोषित करण्यात आली आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी हा आदेश रविवारी जारी केला.
तीन व चारचाकी वाहनांना बंदी असलेले रस्ते- गांधी मैदान ते चितळे रस्ता, चौपाटी कारंजा ते चितळे रस्ता, माणिक चौक ते भिंगारवाला चौक, अर्बन बँक ते भिंगारवाला चौक गंज बाजार कॉर्नर ते भिंगारवाला चौक व चाँद सुलताना विद्यालय ते डांगे गल्ली.
सायंकाळी ६ ते रात्री १ पर्यंत प्रवेश बंद असलेले रस्ते- झेंडीगेट, कोठला स्टँड व नालबंद खुंटाकडून रामचंद्र खुंटाकडे, कोंडय़ामामा चौक, आडते बाजार, गंज बाजारकडून दाळमंडईकडे, सीताराम सारडा शाळेकडून व नवी पेठेकडून कामकर चौकाकडे, आझाद चौक, माणिक चौकाकडून भिंगारवाला चौक व अर्बन बँकेकडे, नालबंद खुंटाकडून भिंगारवाला चौकाकडे, अर्बन बँकेकडून व आझाद चौकाकडून नवी पेठेकडे, दिल्लीगेट व सांगळेगल्लीकडून चौपाटी कारंजाकडे, सर्जेपुरा चौकाकडून तेलीखुंटाकडे, फुलसौंदर चौक व कौठेची तालीमकडून माळीवाडा वेशीकडे, सांगळे गल्लीकडून पटवर्धन चौकाकडे व मेहतर कॉलनीकडून दिल्लीगेट मार्गे नीलक्रांती चौकाकडे.
पार्किंगची ठिकाणे- रंगभवन समोर (सर्जेपुरा), पटांगण गल्ली (दिल्लीगेट), गाडगीळ पटांगण (नालेगाव), बंगाल चौकीजवळ, बापूशाह दग्र्याजवळ (कोठला झोपडपट्टी), गैबीपीर पटांगण (झेंडीगेट), गांधी मैदान, बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाजवळ, सिद्धिबाग जलविहाराजवळ, क्लेरा ब्रुस शाळेचे मैदान, फिरोदिया शाळेचे मैदान, रेसिडेन्शियल शाळेचे मैदान.