18 September 2020

News Flash

बेकायदेशीर रिक्षा पार्किंगमुळे डोंबिवलीत वाहतूक कोंडी

डोंबिवली पश्चिमेतील कायम गर्दी असणाऱ्या पंडित दिनदयाळ चौक, ताश्कंद मॅचिंग सेंटर, विष्णुनगर पोलिस ठाणे तसेच सार्वजनिक प्रसाधनगृहाजवळ रिक्षा चालक बेकायदेशीरपणे वाहने उभे करीत असल्याने मोठय़ाप्रमाणावर

| June 25, 2013 08:29 am

डोंबिवली पश्चिमेतील कायम गर्दी असणाऱ्या पंडित दिनदयाळ चौक, ताश्कंद मॅचिंग सेंटर, विष्णुनगर पोलिस ठाणे तसेच सार्वजनिक प्रसाधनगृहाजवळ रिक्षा चालक बेकायदेशीरपणे वाहने उभे करीत असल्याने मोठय़ाप्रमाणावर वाहतुक कोंडी होत असून  यामुळे येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठय़ाप्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या रिक्षा चालकांवर कारवाई करावी तसेच या परिसरांमध्ये कायमस्वरूपी वाहतुक पोलीस तैनात करावेत अशी मागणी नगरसेविका मनीषा धात्रक यांनी केली आहे. या मागण्यांची पुर्तता न झाल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दीनदयाळ चौक, विष्णुनगर पोलीस ठाणे, प्रसाधनगृह हे तिन्ही रस्ते रेल्वे स्थानकाशी जोडले गेले आहेत. रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारा प्रवासी याच मार्गाने बाहेर पडतो. परंतु, या मार्गावर रिक्षा चालक बेकायदेशीरपणे वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. परिसरात वाहतूक पोलिस उभे असतात ते या रिक्षा चालकांवर कारवाई करीत नाहीत असा आरोप नगरसेविका धात्रक यांनी केला आहे. उपोषणाचा इशारा किंवा वाहतूक विभागाला पत्र दिले की फक्त दोन ते तीन दिवस कारवाई करण्यात येते. दुपारी १२ ते ४ आणि संध्याकाळी ८ ते १२ या वेळेत हे रिक्षा चालक रस्ते अडवून बसलेले असतात. त्यांच्यावर कारवाई न केल्यास ३० जून रोजी आपण उपोषण करणार असल्याचे धात्रक यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2013 8:29 am

Web Title: transport impasse in dombivli because of illegal auto parking
Next Stories
1 बेफिकीर रहिवासी..सुस्त प्रशासन
2 निसर्गाच्या शोषणाने प्रलयाला आमंत्रण
3 मेकओव्हरच्या वल्गना, वरवरच्या मलमपट्टय़ा..!
Just Now!
X