समस्त शिवसनिकांचे आराध्य दैवत हिंदू हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब  ठाकरे यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन विविध कार्यक्रमांनी व संकल्प करून संपन्न  झाला. येथील सुभाष चौकातील मुख्य कार्यक्रमात बाळासाहेबांच्या  प्रतिमेस शिवसेना सातारा जिल्हा उप प्रमुख राजेश उर्फ बंडा कुंभारदरे यांच्या हस्ते पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर शहराच्या विविध संघटनांच्या मार्फत पुष्पांजली वाहण्यात आली.
सर्वप्रथम, बाळासाहेबांच्या विचारांची ज्योत सदैव मराठी माणसाच्या व शिवसनिकांच्या मनात तेवत राहो यासाठी  दीपप्रज्वलन करण्यात आले. मा. बाळासाहेबांचे  विचार अमर असून त्याचे सदैव स्मरण  ठेवून  त्यांनी दिलेल्या महामंत्राद्वारे शिवसनिक मराठी माणसासाठी व िहदुत्वासाठी सदैव कार्यरत राहील, अशा शब्दांत जिल्हा उपप्रमुख राजेश उर्फ बंडा कुंभारदरे यांनी आदरांजली वाहिली. अशाच प्रकारचे विचार व आदरांजली महाबळेश्वर शिवसेना शहर प्रमुख विजय नायडू, किशोर कोमटी यांनी वाहिली.
प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मा. बाळासाहेबांचे मौलिक विचार असलेले भव्य पोस्टर्स शहरभर लावण्यात आले होते. त्यानंतर मुंबईतील कार्यक्रमास अनेक शिवसेना पदाधिकारी रवाना झाले. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक मुरलीधर भिसे, नाना कदम, राजेश गुजर, महेश (अण्णा) पलोड, सचिन पवार ,सागर फळणे,चेतन मोरे, समाधान चौधरी, विजयकुमार दस्तुरे वकील, गणेश जाधव, सुनील यादव, भिकुभाई ठक्कर, दिलीप कानडे, प्रशांत भोसले, अभिजित कानडे,रवींद्र भगत(शाखा प्रमुख) सादिक वारुणकर, अशोक शिंदे, अंकुश  इगावे आदी मान्यवर उपस्थित होते.