News Flash

महामानवास अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी त्यांना आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले. भडकल गेट व विद्यापीठ परिसरात कार्यकर्त्यांनी अभिवादनासाठी गर्दी केली

| December 7, 2013 01:55 am

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी त्यांना आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले. भडकल गेट व विद्यापीठ परिसरात कार्यकर्त्यांनी अभिवादनासाठी गर्दी केली होती. सर्व शासकीय कार्यालयांत, तसेच चौका-चौकात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पसुमने अर्पण करणाऱ्यांची गर्दी होती.
भडकल गेटजवळील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला सर्वच प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. विद्यापीठात या निमित्ताने विशेष व्याखानांचे आयोजन करण्यात आले होते.
लातूरात अभिवादन
वार्ताहर, लातूर
महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर पार्क येथील आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळय़ास शहरातील आबालवृद्धांनी अभिवादन केले. महापौर स्मिता खानापुरे, उपमहापौर सुरेश पवार, काँग्रेस गटनेते विक्रमसिंह चौहान यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे, मुर्तुजा खान, विनोद रणसुभे, राजा मणियार, भाजपतर्फे डॉ. सुनील गयकवाड, अभिमन्यू पवार, भीमशक्तीचे प्रदेश सरचिटणीस मोहन माने, जि. प. चे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे आदींनी अभिवादन केले. लोकसेवा मंडळ व रा. स्व. संघाच्या वतीने संयुक्तपणे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात १५३ जणांनी रक्तदान केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फेही दिवसभर रक्तदान शिबिर सुरू होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2013 1:55 am

Web Title: tribute to dr babasaheb ambedkar
Next Stories
1 हरिभक्तपरायण ‘राजूबाबा’!
2 काँग्रेस-राष्ट्रवादीची परस्परांवर कुरघोडी!
3 बीडमध्ये पावणेदोनशे कोटींच्या आराखडय़ास मंजुरी
Just Now!
X