राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा उद्यापासून (गुरुवारी) सुरू होत आहे. औरंगाबाद विभागात १ लाख १९ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यातील ४७ हजार विद्यार्थी विज्ञान शाखेचे आहेत. गेल्या वर्षी १ लाख १३ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी व कॉपी होऊ नये, म्हणून परीक्षा मंडळाने ६ भरारी पथके गठीत केली आहेत.
कॉपीमुक्तीसाठी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारीही सहभागी होणार आहेत. या वर्षी परीक्षा केंद्रात जाताना प्रत्येक विद्यार्थ्यांला त्याचे बूट आणि मोजे बाहेर काढूनच जावे लागणार आहे. बहुतांशी विद्यार्थी मोज्याच्या आत कॉपी दडवून ठेवतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दुर्गम भागातही कॉपी होऊ नये म्हणून परीक्षा मंडळाने काळजी घेतली असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाचे विभागीय सचिव प्रकाश पठारे यांनी सांगितले. औरंगाबाद विभागात बीड, जालना, परभणी, हिंगोलीसह ३३२ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
लातूर विभागात ७३ हजार परीक्षार्थी
लातूर – लातूर विभागातील नांदेड, उस्मानाबाद व लातूर जिल्हय़ांमधील ७३ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. १८९ केंद्रांमध्ये परीक्षा होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष एन. एच. मुल्ला यांनी दिली. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी, या साठी प्रत्येक जिल्हय़ात १२ भरारी पथके नियुक्त केली आहेत. यात बठय़ा पथकाचाही समावेश आहे. भरारीपेक्षा बठय़ा पथकाचा प्रभाव कॉपीचे प्रकार थांबविण्यावर अधिक होतो, हे लक्षात घेऊन यंदाही ही पद्धत अवलंबली आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिका मराठीतून प्रथमच उपलब्ध केल्या आहेत. मात्र, लातूर शिक्षण मंडळातून एकाही विद्यार्थ्यांने यंदा अर्ज केला नाही. दोन वर्षांपूर्वी राज्यात प्रथमच मराठीतून परीक्षा व्हावी, असा आग्रह धरत लातूरच्याच विद्यार्थ्यांने मागणी केली होती. यंदा मंडळाने स्वतहून तयारी केली आहे. दि. २९ मार्चपर्यंत बारावीची परीक्षा, तर ३ ते २७ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत.
परभणीत ५२ केंद्रांवर परीक्षा
परभणी – जिल्ह्यातील १८ हजार १५७ विद्यार्थी ५२ केंद्रांवरून बारावीची परीक्षा देणार आहेत. या साठी महसूल व शिक्षण विभागांची ७७ पथके स्थापन केली. जिल्हा प्रशासनाने परीक्षेनिमित्त जय्यत तयारी केली असून परीक्षा केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त तनात केला. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांची बठक घेऊन कॉपीमुक्ती अभियान राबविण्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या होत्या. यंदा जिल्ह्यातील १८ हजार १५७ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. या साठी परभणी शहरासह जिल्ह्यात ५२ केंद्रे स्थापन केली आहेत. परीक्षेत गरप्रकार होऊ नयेत, या साठी ५२ बठी पथके तयार केली आहेत. या बरोबरच महसूल विभागाची २५ भरारी पथके कार्यरत राहणार आहेत. पथकात ४ उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तिन्ही शिक्षणाधिकारी यांचा समावेश राहणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.