महालक्ष्मी नगरवासीयांची कैफियत
पनवेल परिसरात स्वस्तात सदनिका विकत मिळत असल्या तरी विकासक सुविधांबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करेलच, याची कोणतीही शाश्वती नाही. उलट विकासकांच्या भूलथापांना भुलून जाऊ नका, असे सांगण्याची वेळ तालुक्यातील नेरे गावालगतच्या महालक्ष्मी नगरमधील अडीच हजार रहिवाशांवर आली आहे. कारण सदनिका विकत घेऊन तीन वर्षे झाली तरी येथील अडीच हजारांहून अधिक रहिवासी कूपनलिकेचे तुरट आणि खारट पाण्यापर आपली तहान भागवत आहेत. दोन हजार चौरस फुटाने पाच वर्षांपूर्वी महालक्ष्मी नगरमधील सदनिका विक्रीसाठी बुिकंग सुरू झाली. मुंबई आणि उपनगरातून अनेकांनी आपल्या सेवानिवृत्तीची रक्कम तर काहींनी कर्ज काढून महालक्ष्मीचे विकासक केतन पारेख यांच्या कंपनीमध्ये जमा करून हक्काच्या घराचे स्वप्न
पूर्ण केले. २०११मध्ये महालक्ष्मी नगरमधील सदनिकांचा ताबा घरमालकांना देण्यात आला. मात्र पनवेलपासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ११ एकर जमिनीवर उभारल्या जाणाऱ्या या गृहप्रकल्पास विकासक पाणीपुरवठा करू शकलेले नाहीत. या प्रकल्पात १२५ इमारतींमध्ये १५०० फ्लॅट आहेत. यामध्ये साडेसात हजार रहिवासी राहणार होते. मात्र पाण्याची सोय नसल्याने येथे राहायला अनेकांनी येथे राहायला येणे लांबणीवर टाकले. मात्र ज्यांना दुसरा कोणताही पर्याय नव्हता, ते इथे राहायला आले.  सध्या विकासकाने येथील रहिवाशांसाठी सोसायटीमध्ये पाण्यासाठी कूपनलिका खोदल्या आहेत. तुरट आणि बेचवीचे पाणी येथील रहिवासी पिऊन राहतात. काहीजण बाजारातून पाण्याची २० लिटरची बाटली आणतात, तर काही रहिवाशांनी घरात पाणी शुद्धिकरणाचे उपकरण लावून घेतले आहे. अनेक घरमालक येथे राहायला न आल्यामुळे आणि विकासकाचे बांधकाम पूर्ण न झाल्याने अजून सोसायटीचा ताबा विकासकाने घरमालकांना दिला नाही. त्यासाठी रहिवासी महालक्षमी नगर विकासकाच्या कार्यालयात खेटे मारत असतात. अरिहंत सोसायटीपर्यंत पाण्याची सोय सरकारने केल्यानंतर पुढील पाण्याच्या वाहिनीची जोडणी मी करेन, असे विकासक केतन पारेख त्यांना सांगत आहेत