News Flash

कोयना धरणात गतवर्षीच्या तुलनेत अडीचपट पाणीसाठा

कोयना धरणाच्या पाणीसाठय़ात चालू पावसाळी हंगामाच्या २९ दिवसांत बक्कळ ३६ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. सध्या धरणाचा पाणीसाठा ६५ टीएमसी म्हणजेच ६१.७५ टक्के असून, २०,९८४

| July 7, 2013 01:11 am

कोयना धरणाच्या पाणीसाठय़ात चालू पावसाळी हंगामाच्या २९ दिवसांत बक्कळ ३६ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. सध्या धरणाचा पाणीसाठा ६५ टीएमसी म्हणजेच ६१.७५ टक्के असून, २०,९८४ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. गतवर्षी आज अखेरचा पाणीसाठा २८.६६ म्हणजेच सुमारे २७ टक्के राहताना, पाणीसाठय़ात केवळ २ टीएमसीची वाढ झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास अडीचपट पाणीसाठा आहे.
धरणक्षेत्रात पावसाचा रात्रीचा जोर रहात असताना, दिवसाची रिपरिपही कायम आहे. धरणाखालील कराड व पाटण तालुक्यात हलक्या सरी कोसळणे सुरूच असून, खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. समाधानकारक पावसामुळे कृष्णा, कोयना काठचा बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे. मात्र, खटाव, माण, फलटण तालुक्यासह दुष्काळी पट्टय़ात अपेक्षित पाऊस नसल्याने दुष्काळाची दाहकता पुन्हा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
चालू हंगामात धरण क्षेत्रात सरासरी १,९६२.२५ मि. मी. पावसाची नोंद आहे. त्यात नवजा विभागात सर्वाधिक २,०५६ मि. मी. पाऊस झाला आहे. गतवर्षी धरण क्षेत्रात सरासरी ७८४.३३ मि. मी. तर, नवजा विभागात सर्वाधिक ९६६ मि.मी. पावसाची नोंद आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास अडीचपट जादा पाऊस झाला असून, यंदा हे महाकाय धरण सव्वा ते दीड महिने अगोदर भरण्याची शक्यता आहे.
आज सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत कोयना धरण क्षेत्रातील कोयनानगर विभागात ७० एकूण १८५९ मि. मी., महाबळेश्वर विभागात ४४ एकूण १९५४ मि. मी., नवजा विभागात ८६ एकूण २०२७ तर, प्रतापगड विभागात ३२ एकूण २००९ पावसाची नोंद आहे. आज दिवसभरात कोयनानगर २५, नवजा २९ तर महाबळेश्वर विभागात ६ मि. मी. पावसाची नोंद आहे. १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणाचा पाणीसाठा ६५ टीएमसी असून, पाणी पातळी २,१२४ फूट ३ इंच आहे.
आज सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत कराड तालुक्यात सरासरी ३.९३ तर एकूण १७३.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यात कोळे मंडलात सर्वाधिक  २५७.१ तर शेणोली विभागात सर्वात कमी १३६ मि. मी. एकूण पाऊस झाला आहे. पाटण तालुक्यात धरण क्षेत्रातील नवजा व कोयनानगर वगळता उर्वरित दहा मंडलामध्ये १०.४ मि. मी. तर एकूण ३४७.४ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यात पाटण मंडलात सर्वाधिक ५८५ तर तारळे मंडलात सर्वात कमी १६६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 1:11 am

Web Title: two and a half times water reserve in koyna comparison of last year
Next Stories
1 ‘पुणे, नांदेड शहरामध्ये लवकरच हज हाउस’
2 दलाई लामा श्रीरामपूरला येणार जागतिक धम्म परिषदेचे आयोजन
3 नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ रंगभवनचे वैभव पुन्हा पाहायचे आहे- पंडित केसकर
Just Now!
X