19 January 2019

News Flash

मठाधिपतींवर हल्ला करणारे दोघे ताब्यात, कोळगावात ‘बंद’

सूर्यमंदिर देवगिरी संस्थानच्या महाराजांवर तिघांनी प्राणघातक हल्ला केला. यातील दोघांना गावातील लोकांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, तिसरा हल्लेखोर पळून गेला.

| May 19, 2013 01:20 am

सूर्यमंदिर देवगिरी संस्थानच्या महाराजांवर तिघांनी प्राणघातक हल्ला केला. यातील दोघांना गावातील लोकांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, तिसरा हल्लेखोर पळून गेला. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी कोळगावच्या व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद पाळून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे सूर्यमंदिर देवगिरी संस्थान आहे. हनुमानमहाराज हाडुळे हे संस्थानचे मठाधिपती आहेत. शुक्रवारी रात्री हाडुळेमहाराज मंदिरात पूजा करत असताना आलेल्या तिघांनी महाराजांवर हल्ला चढवला. महाराज मंदिराबाहेर पळाले व लोकांना माहिती दिली. घटनास्थळी धावून आलेल्या लोकांनी मारहाण करणाऱ्या सतीश माणिकराव उगले व माउली अशोक साळुंके या दोघांना पकडून बेदम चोप दिल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. तिसरा मारेकरी विरास खरांडे पळून गेला. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी कोळगावच्या व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद पाळून दोषींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.

First Published on May 19, 2013 1:20 am

Web Title: two arrested as they attacked on hanumanmaharaj hadule
टॅग क्राईम