03 August 2020

News Flash

रबाळेत पिस्तूल विक्रीसाठी आलेले दोन जण अटकेत

रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना सोमवारी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तुले हस्तगत करण्यात आली आहेत

| April 17, 2014 09:26 am

रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना सोमवारी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तुले हस्तगत करण्यात आली आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश केणी (२३) आणि परेश रुखाडे (२२) अशी आरोपींची नावे आहेत. एमआयडीसी येथील रॉयल पार्क हॉटेललगत दोन व्यक्ती पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया मोरे यांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी दुपारी पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला होता. यावेळी दोन तरुण तेथे संशयास्पदरीतीने वावरताना पोलिसांना आढळून आले. त्यांच्या झडतीत एकाकडे विदेशी बनावटीचे, तर दुसऱ्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. त्यानुसार या दोघांनाही अटक केल्याचे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. त्यांच्या गुन्हेगारी पाश्र्वभूमीचा तपास सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2014 9:26 am

Web Title: two arrested for saleing guns
Next Stories
1 जुने मुख्यालय सोडताना कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले
2 उरण शहरात विजेच्या लपंडाव
3 खारघरमध्ये सिडकोच्या साडेतीन हजार घरांसाठी पुढील महिन्यात अर्जविक्री
Just Now!
X