मंठा तालुक्यातील पेवा येथे शनिवारी दोन मुलींचे मृतदेह एका विहिरीत आढळून आले. कोमल हरिभाऊ नरवडे (वय ९), सोनी गजानन गव्हाणे (वय ७) अशी या मुलींची नावे आहेत. पेवा गावच्या पोलीस पाटलांनी मंठा पोलीस ठाण्याकडे मृतदेह सापडल्याची तक्रार केली. घटनेचे वृत्त समजताच वरिष्ठ पोलीस व महसूल अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली.  पाणी भरताना मुलींचा विहिरीत पडून बुडाल्याने मृत्यू झाला असावा, अशी चर्चा आहे.