News Flash

विवाहितेवर दोघांचा बलात्कार

केबल ऑपरेटर असल्याची बतावणी करून घरात घुसलेल्या दोघांनी एका विवाहित महिलेचे हात-पाय बांधून तिच्यावर ब्लेडने वार करून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याची घृणास्पद घटना घडली आहे.

| May 22, 2014 12:32 pm

केबल ऑपरेटर असल्याची बतावणी करून घरात घुसलेल्या दोघांनी एका विवाहित महिलेचे हात-पाय बांधून तिच्यावर ब्लेडने वार करून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याची घृणास्पद घटना घडली आहे. मुंबई-नाशिक महामार्गालगत गोठेघर गावात सोमवारी दुपारी ही घटना घडली.
गोठेघर गावात आपल्या नातेवाईकांकडे उत्तर प्रदेशाहून एक विवाहित महिला आली होती. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास केबल ऑपरेटर आहोत, केबल दुरुस्त करायची असल्याचे सांगून दोन अनोळखी व्यक्ती घरात घुसले. पीडित महिला घरात एकटीच असल्याचे बघून त्या दोघांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्या महिलेने प्रतिकार करताच तिचा मोबाइल फोडून तिच्यावर ब्लेडने वार केले व तिचे हात-पाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. या गंभीर प्रकारामुळे भयभीत झालेली महिला बेशुद्ध झाल्यानंतर ते दोघेही तेथून फरार झाले. पीडित महिलेवर ठाणे येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्य़ासह घरात घुसून ब्लेडने वार करणे, बांधून ठेवणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले असून फरार झालेल्या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती शहापूरचे साहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसाहेब शिंदे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 12:32 pm

Web Title: two men raped married woman
Next Stories
1 वृक्ष प्राधिकरणावरही राजकीय अतिक्रमण
2 बेकायदा पार्किंगचा ‘कल्याण’ला वेढा
3 बदलापूरकरांची नाटय़गृहाची प्रतीक्षा कधी संपणार?
Just Now!
X