04 July 2020

News Flash

कोयना परिसरात दोन वेळा भूकंप

कोयना धरणासह सातारा व रत्नागिरी जिल्ह्याचा काही भाग हलवून सोडणारे भूकंपाचे दोन धक्के गुरूवारी रात्री जाणवले. पहिल्या धक्क्याची नोंद रिश्टर स्केलनुसार ४ रिश्टर स्केल, तर

| September 8, 2013 02:17 am

कोयना धरणासह सातारा व रत्नागिरी जिल्ह्याचा काही भाग हलवून सोडणारे भूकंपाचे दोन धक्के गुरूवारी रात्री जाणवले. पहिल्या धक्क्याची नोंद रिश्टर स्केलनुसार ४ रिश्टर स्केल, तर दुसरा ३ रिश्टर स्केल होता. मात्र, सुदैवाने वित्तहानी झाली नसल्याची माहिती तहसीलदार रवींद्र हसबनीस यांनी दिली. भूकंपाचा कोयना धरणावर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता एम. आय. धरणे यांनी दिली. गुरूवारी रात्री १०.१० वा. ४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून १०.४ किलोमीटर अंतरावर गोशवाडी गावच्या दक्षिणेस होता. त्याची खोली ८ कि. मी. इतकी होती. तर ११.०४ वाजता दुसरा भूकंपाचा धक्का बसला.  त्याचा केंद्रबिंदू १०.४ कि. मी. अंतरावर पहिल्याच ठिकाणी होता. हा भूकंपाचा धक्का प्रामुख्याने कोयना, पाटण, कराड, अलोरे, चिपळूण या विभागात जाणवला. मात्र, भूकंपामुळे कोठेही वित्तहानी झाली नसल्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सांगितले. तर, कोयना धरण पूर्णत: सुरक्षित असल्याचे एम. आय. धरणे यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2013 2:17 am

Web Title: two time earthquake in koyna surroundings
Next Stories
1 नाकाबंदी चुकविण्याच्या प्रयत्नात गुन्हेगाराच्या मोटारीचा अपघात
2 रंकाळय़ाच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेचा रास्ता रोको
3 ‘शिक्षण मंडळ बरखास्तीच्या निर्णयाचा फेरविचार करावा’
Just Now!
X