18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

दोन बायका, गंमत ऐका!

दोन बायका एकत्र आल्यानंतर तिथे उपस्थित नसलेल्या तिसऱ्या बाईबद्दल ‘गॉसिप’ करतात(च!) तसेच दोघी एकत्र

प्रतिनिधी, मुंबई | Updated: February 8, 2013 1:25 AM

दोन बायका एकत्र आल्यानंतर तिथे उपस्थित नसलेल्या तिसऱ्या बाईबद्दल ‘गॉसिप’ करतात(च!) तसेच दोघी एकत्र आल्यानंतर ‘आपणच कसे मोठे’ हे सांगायचा प्रयत्न दोघीही करतात(च!). याचा प्रत्यय ‘साहिब, बीबी और गँगस्टर रिटर्न्‍स’च्या सेटवर प्रत्येकालाच आला. माही गिल आणि सोहा अली खान या दोघीही तिसरीबद्दल गप्पा मारण्याऐवजी आपणच कशा मोठय़ा आहोत, हे एकमेकींना पटवून देत होत्या. पण या दोन बायकांच्या गमतीमध्ये सेटवरच्या लोकांना मात्र कायमची टकळी ऐकावी लागली.तिग्मांशु धुलियाच्या या चित्रपटात काम करणाऱ्या सोहा आणि माही दोन शॉट्समध्ये वेळ मिळाला रे मिळाला की, एकमेकींच्या बाजूला बसून कुजबूज सुरू करायच्या. या गप्पांचा विषय भन्नाट होता. माही आपल्या सौंदर्याबद्दल आणि त्या सौंदर्याची प्रशंसा कोणी कशी केली, याबद्दल सोहाला सांगत राहायची. तर दुसऱ्या सोहा आपल्या राजघराण्याची, राजेशाही थाटाची टकळी माहीसमोर चालू ठेवायची. आता चित्रपटाची पाश्र्वभूमी बऱ्यापैकी राजेशाही असल्याने माहीला बिचारीला सोहाचे राजेशाही थाट निमूटपणे ऐकावेच लागत होते.
सेटवर असलेल्या काही जणांच्या मते माही सोहाचे थाट फार काही गंभीरपणे ऐकत नव्हती. आणि सोहाकडेही आपल्या राजघराण्याशिवाय इतर काहीच सांगण्यासारखे नव्हते. माहीचे सौंदर्याख्यान आणि सोहाचे राजेशाही थाट यामध्ये सेटवरच्या माणसांची मात्र चांगलीच करमणूक होत होती. या सर्वानाच ‘दोन बायका गंमत ऐका’चा नवा फार्स प्रत्यक्षात पाहायला मिळत होता.

First Published on February 8, 2013 1:25 am

Web Title: two womens and listen the gossip