27 September 2020

News Flash

मुंब्य्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

मुंब्रा येथील कौसा तसेच दौलतनगर भागातील चार अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने हातोडा मारला असून या कारवाईसाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

| December 12, 2012 09:13 am

मुंब्रा येथील कौसा तसेच दौलतनगर भागातील चार अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने हातोडा मारला असून या कारवाईसाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुंब्रा तसेच दिवा भागातील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत मंगळवारी दिवा तसेच कौसा भागातील चार अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमण पथकाने कारवाई केली. महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. तसेच या कारवाईसाठी परिसरात राज्य राखीव दलाच्या दोन तुकडय़ा, १०० पोलीस अधिकारी व कर्मचारी, असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापालिकेच्या सुमारे १०० कर्मचाऱ्यांनी दिवा तसेच कौसा येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. यामध्ये आरसीसी तळमजल्याची इमारत पूर्णत: जमीनदोस्त करण्यात आली. तसेच तळ अधिक एक मजली इमारतही तोडून टाकण्यात आली. याच परिसरातील चार मजली इमारतीचे कॉलम व भिंतीचे बांधकाम तोडण्यात आले. दौलतनगर येथे तळ अधिक चार मजल्यांच्या व्यापत असलेल्या पाचव्या मजल्याचे बांधकामही तोडण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 9:13 am

Web Title: unauthorised construction demolished in mumbra
Next Stories
1 कल्याण-डोंबिवलीच्या ग्रामीण भागांत अनधिकृत बांधकामांचे पीक !
2 रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिका घेणार वाहतूक शाखेची मदत
3 सदाशिव टेटविलकर यांचा ‘इंद्रधनु’तर्फे गौरव
Just Now!
X