News Flash

निसर्ग मित्र मंडळाच्या वतीने आजपासून भूजल अभियान

भूजल वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि अभ्यास यासाठी निसर्ग मित्र मंडळाच्या वतीने १७ मार्चपासून भूजल अभियान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील ६२ टक्के शेती भूजलावर अवलंबून

| March 17, 2013 12:04 pm

भूजल वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि अभ्यास यासाठी निसर्ग मित्र मंडळाच्या वतीने १७ मार्चपासून भूजल अभियान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील ६२ टक्के शेती भूजलावर अवलंबून आहे. तसेच ग्रामीण भागातील ९२ टक्के जनता पिण्याचे पाण्याचा उपसा करते. मात्र, भूजल वाढविण्यासाठी राष्ट्रीय जलधोरणात नगण्य निधी उपलब्ध आहे. ही समस्या उग्र रूप धारण करणारी असल्याने भूजल अभियान सुरू करण्यात येणार आहे.
१७ मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत भूजल वाढविण्याच्या दृष्टीने स्वत: करावयाच्या उपाययोजना, पाण्याचा मोजून वापर, भूजल उपलब्धतेनुसार घ्यावयाची पिके, भूजल संवर्धन, फेरभरण व फेरवापर तसेच प्रदूषणमुक्त भूजल या विषयीचे प्रबोधन या अभियानादरम्यान होणार आहे. यासाठी एक प्रश्नावली विकसित करण्यात आली असून त्यातील माहितीचे विश्लेषण करून मूळ समस्या शोधली जाईल. १७ मार्च रोजी झालटा येथून या अभियानास सुरुवात होणार असून पोफळा, वाघोळा, जामखेडा, बोरहिरा, अंजनडोह, डोणवाडा, चारठा, बाळापूर, गांधेली, बाभुळगाव, निपाणी, आडगाव व भालगाव येथे भूजल दिंडी काढण्यात येणार आहे.
तसेच प्रश्नावलीद्वारे सर्वेक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. या उपक्रमात निसर्ग मित्र मंडळाबरोबर जीवो फोरम, भूजल सर्वेक्षण यंत्रणा, मैत्री कॉम्प्युटर, निर्माण, सजग महिला संघर्ष समिती यांसह विविध संस्था सहभागी होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 12:04 pm

Web Title: under ground water campaign by nature friend forum
Next Stories
1 चैतन्यमहाराज देगलूरकर यांचे आज व्याख्यान
2 दोन मुलींचा बुडून मृत्यू
3 पत्रकार हल्ला प्रकरणाची प्रेस कौन्सिलकडून दखल
Just Now!
X