News Flash

‘युनेस्को’ने मनसरला जागतिक वारसास्थळाचा दर्जा द्यावा

महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय वास्तू राज्य आणि केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे विकासापासून कोसो दूर आहेत.

| June 21, 2014 07:03 am

‘युनेस्को’ने मनसरला जागतिक वारसास्थळाचा दर्जा द्यावा

महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय वास्तू राज्य आणि केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे विकासापासून कोसो दूर आहेत. विदर्भातील मनसर ही त्यापैकीच एक वास्तू असून ती २२०० वष्रे जुनी असल्याचे सांगितले जाते. याच वास्तूत आतापर्यंतच्या उत्खननात सुमारे २७०० वस्तू सापडल्या आहेत.
त्यामुळे युनेस्कोद्वारा मनसरला जागतिक वारसास्थळाचा दर्जा देण्यात यावा आणि त्याकरिता केंद्रीय पुरातत्त्व विभागाने पाठपुरावा करावा, अशी मागणी विदर्भ जनकल्याण व विकास संस्थेने (वेद) केली आहे.
नागपुरपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ७वर मनसर ही ऐतिहासिक व पुरातत्त्व वास्तू आहे. आजपर्यंत याठिकाणी झालेल्या उत्खननात सुमारे २७०० विविध वस्तू सापडल्या आहेत. वाकाटककालीन, सातवाहन, बौद्धकालीन वस्तू तसेच मानवी अस्तित्त्वाचे दाखले देणाऱ्या खाणाखुना सापडल्या आहेत. उत्खननादरम्यान आढळलेल्या दुर्मीळ वस्तू या देशाची संपत्ती असल्यामुळे त्याच्या जतनाची जबाबदारी केंद्रासह राज्याचीसुद्धा आहे. त्यामुळे मनसर येथे जागतिक व उच्च दर्जाचे संग्रहालय झाल्यास उत्खननात आढळलेल्या वस्तू त्या संग्रहालयात माहितीसह ठेवण्यात येतील. त्यामुळे या ऐतिहासिक व पुरातत्त्वीय वस्तूंचा अभ्यास  करणे अभ्यासकांना सोपे जाईल. मनसर येथे सुमारे १०० एकरचा परिसर उत्खननाकरिता राखीव करण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे दोन तृतीयांश परिसरात उत्खनन झाले आहे.
युनेस्कोने आतापर्यंत संपूर्ण भारतातील २७ स्थळांना जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे. त्यात महाराष्ट्रातील एलिफंटा केव्ह, छत्रपती शिवाजी टर्मिनल आणि अजंठा, एलोरा या स्थळांचा समावेश आहे. जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करताना युनेस्कोच्या दहा निकषांना सामोरे जावे लागते. या सर्व निकषात मनसर पूर्णपणे बसत असून त्यासाठी फक्त प्रस्ताव पाठविण्याची गरज आहे. हा प्रस्ताव तयार करण्यासाठी आर्किओलॉजी सव्‍‌र्हे ऑफ इंडियाच्या तज्ज्ञांची समिती बसवावी लागणार आहे. या समितीकडून युनेस्कोला प्रस्ताव गेल्यानंतर युनेस्कोची चमू या स्थळाचे निरीक्षण करण्यास येईल. त्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ‘वेद’ने केली आहे. मनसरला जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाल्यास पर्यटनाच्यादृष्टीने फार मोठा फायदा होणार आहे. भारतातील सुमारे ३० ते ४० टक्के पर्यटकांचा कल ऐतिहासिक स्थळांच्या भेटीकडे असतो. त्यामुळे मनसरला जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाल्यास आजूबाजूच्या पर्यटनस्थळांकडेसुद्धा पर्यटक वळू शकेल. यासंदर्भात वेदने केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांना निवेदन दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2014 7:03 am

Web Title: unesco should give world heritage site status to mansar
टॅग : Nagpur
Next Stories
1 किरकोळ बाजारात भाज्या महागल्या
2 विदर्भाच्या प्रकल्पातील जलसाठा घटला
3 ‘वनहक्क कायद्याबाबतच्या तरतुदींवर अंमलबजावणीचे आव्हान’
Just Now!
X