News Flash

अदानी फाऊंडेशनतर्फे खेळाडूंना गणवेश वाटप

स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाद्वारे सुरू होत असलेल्या क्रीडा उत्सवात भाग घेणाऱ्या खेळांडूना अदानी फाऊंडेशनने गणवेशाचे वाटप करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. गुमाधावडा, चिरेखनी, बेरडीपार आणि जमुनिया या

| January 15, 2013 01:21 am

स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाद्वारे सुरू होत असलेल्या क्रीडा उत्सवात भाग घेणाऱ्या खेळांडूना अदानी फाऊंडेशनने गणवेशाचे वाटप करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
गुमाधावडा, चिरेखनी, बेरडीपार आणि जमुनिया या शाळेच्या खेळाडूंना गणवेश वाटपाचा कार्यक्रम उच्च प्राथमिक शाळा बेरडीपार येथे नुकताच पार पडला.  अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सदस्य ललिता जांभूळकर, सरपंच तोमेश्वरी पटले, उपसरपंच बबीता गौतम, चिरेखनीचे सरपंच भुमेंद्र पारधी, अदानी फाऊंडेशनचे समन्वयक सुबोधसिंग, बंडू, कासार, कैलाश रेवतकर, भाग्यव्री हिरेखन, मुख्याध्यापक डी.बी. पारधी, सामाजिक कार्यकर्ता राजेश तुरकर, नरेंद्र गौतम, वाय.बी.चव्हान, उच्च व्रेणी मुख्याध्यापक डी.डी.शहारे, संगीता गेडाम, गीता परतेती, किरण बन्सोड, चु.रा. कटरे, अनिल रहांगडाले, किरण रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.यावेळी मार्गदर्शन करताना अदानी फाऊंडेशनचे सुबोधसिंग यांनी अदानी विद्युत प्रकल्पाने दत्तक घेतलेल्या व प्रस्तावित असणा-या गावांना फाऊंडेशनच्या मार्फत देण्यात येणा-या सुविधा या केवळ तात्पुरत्या नाही. प्रोजेक्ट जेव्हापर्यंत अस्तीत्वात राहिल तोपर्यंत गावक-यांना सहकार्य करण्याचा उपक्रम सुरूच राहिल. अदानी फाऊंडेशन आपल्या पाठीशी राहून विकासाचे कामे करण्यास कटिबध्द आहोत. असे फाऊंडेशनचे समन्वयक सुबोधसिंग यांनी आपल्या यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले. अदानी पावर प्लांटचे संचालकांनी फाऊंडेशनच्या माध्यमाने नागरिकांना आवश्यक गरजेच्या पूर्तता करण्याचे स्पष्ट निर्देश असल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2013 1:21 am

Web Title: uniform giving program by adani foundation for players
Next Stories
1 ‘आपल्या क्षमतांच्या वापरावरच भवितव्य ठरते’
2 बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या घरांचे आज हस्तांतरण
3 शिक्षणाधिकारी स्वत:चा निर्णय फिरवू शकत नाही
Just Now!
X