30 September 2020

News Flash

विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय युवा महोत्सव रविवारपासून

देशातील युवकांना प्रेरणा देण्यासाठी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्वाचे आयोजन करण्याची संधी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाला मिळाली असून

| September 19, 2014 03:11 am

देशातील युवकांना प्रेरणा देण्यासाठी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्वाचे आयोजन करण्याची संधी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाला मिळाली असून  २१ सप्टेबरपयर्ंत तो साजरा केला जाणार आहे.
या महोत्सवात संगीत, नृत्य, गायन, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, ऑन द स्पॉट पेंटिंग, पोस्टर बनविणे, मिमिक्री, रांगोळी, एकांकिका, लोकनृत्य, समूहगान, लोकगीत, शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय गायन, शास्त्रीय वादन, वेस्टर्न सोलो, वेस्टर्न ग्रुप साँग, फोक ऑर्केस्ट्रा, काव्यगायन, स्वरवाद्य, शिल्पकला, कोलाज, स्कीट, माईम इत्यादी स्पर्धाचा समावेश आहे.  सकाळी ११ वाजता श्री शिवाजी महाविद्यालयात दिवं. डॅडी देशमुख खुला रंगमंचावर या महोत्सवाचे उद्घाटन होत आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अरुण शेळके हे उद्घाटक असून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मोहन खेडकर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत.
यापूर्वी या महोत्सवाचे आयोजन श्री शिवाजी महाविद्यालयाने २००८ मध्ये केले होते. या युवा महोत्सवामुळे अकोला शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचले होते. चार दिवसात कलावंतांचा महाकुंभ येथे होणार आहे. त्यात अकोलेकरांना विविध कलांची मेजवानी, तसेच महाविद्यालयीन युवक-युवतींमधील सुप्त कलागुणही प्रकट होणार आहेत.
अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ व वाशीम या पाच जिल्ह्य़ातील सुमारे ३५० महाविद्यालयातील सुमारे ५ हजार विद्यार्थी भाग घेणार आहेत. विविध अशा २३ प्रकारच्या स्पर्धा यात होणार आहेत. या महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मूल्यमापन करण्यासाठी ६० परीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष भडांगे व युवा महोत्सव समन्वयक प्रा.किशोर देशमुख यांनी दिली. या महोत्सवाला हातभार लावणारे उपप्राचार्य डॉ.एस.पी.देशमुख, डॉ.एम.आर.इंगळे, अनुराग मिश्र, प्रा.हषवर्धन मानकर, डॉ.मोहन खडसे, आनंद चौबे, प्रा.राहुल माहुरे व प्रा.संजय काळे उपस्थित होते. याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2014 3:11 am

Web Title: university level national youth festival on sunday
Next Stories
1 मध्यवर्ती कारागृहातून आरोपीचे पलायन
2 तीन वर्षांनंतर शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
3 नवरात्रोत्सव, दिवाळीनिमित्त नागपूरमार्गे विशेष गाडय़ा
Just Now!
X