22 September 2020

News Flash

अज्ञात इसमांचा रेल्वे पोलिसावर हल्ला

सायन रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलिसावर अज्ञात इसमांनी मागून लोखंडी रॉडने हल्ला केला.

| June 13, 2015 02:10 am

सायन रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलिसावर अज्ञात इसमांनी मागून लोखंडी रॉडने हल्ला केला. सुधीर जठार (३२) असे या पोलीस शिपायाचे नाव असून ते दादर रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले असून त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली.
जठार बुधवारी संध्याकाळी सायन रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर होते. संध्याकाळी सातच्या सुमारास ते फलाट क्रमांक २ आणि ३ वरील कुल्र्याच्या दिशेने उभे असताना मागून दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. जठार यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करून घरी सोडण्यात आले. दादर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे. मागील आठवडय़ात भायखळा रेल्वे स्थानकावर दोन परदेशी नागरिकांनी रेल्वे पोलिसांवर हल्ला केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 2:10 am

Web Title: unknown man attack on the railways police
Next Stories
1 नरकयातनांची वस्ती..
2 ना जागा, ना बांधकाम तरीही लाच मागितल्याचा आरोप
3 ‘टायअप’मुळे महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष
Just Now!
X