News Flash

‘सीम्स’ रुग्णालयात अपस्मारावर शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध

अपस्मार (फिटस्) आजार असलेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याला फिटस् येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

| March 27, 2014 10:39 am

अपस्मार (फिटस्)  आजार असलेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याला फिटस् येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पद्धतीच्या शस्त्रक्रिया आता सीम्स रुग्णालयात केल्या जात असून गेल्या आठ महिन्यांत अशा सहा रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याची माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. जी.एम. टावरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फिट्स या आजारावर पूर्वी औषधोपचार करून नियंत्रण मिळविले जात असे. औषधोपचाराने फिटस् हा आजार पूर्णपणे बरा होत नसे. शस्त्रक्रिया केल्यानंतर फिटस् हा आजार दूर होऊ शकतो. शस्त्रक्रियेत मेंदूतील विशिष्ट भाग काढून टाकला जातो. अशा प्रकारच्या ७० टक्के शस्त्रक्रिया यशस्वी होतात. त्यामुळे रुग्णाला नंतर फिटस् येत नाही. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी आपले अनुभव सांगितले. यामध्ये छत्तीसगडमधील दोन तर मध्यप्रदेशातील सौंसर येथील एका रुग्णाच्या नातेवाईकांचा समावेश होता. शस्त्रक्रिया केव्हा केली जाते, तसेच त्या किती टक्के यशस्वी होतात, याची माहिती मेंदू शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. अमित धाकोजी व एपीलेप्टोलॉजीस्ट डॉ. नीरज बाहेती यांनी यावेळी दिली.
काही वर्षांपूर्वी ही सुविधा मुंबई, चेन्नई, दिल्ली येथेच उपलब्ध होती.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 10:39 am

Web Title: upsmar operation in hospital
टॅग : Loksatta,Marathi
Next Stories
1 नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा खटला सुरू करण्याच्या हालचाली
2 शिक्षणसेवकांची राष्ट्रपतींना इच्छामरणाची प्रार्थना
3 विधिसभेवर अनिश्चिततेचे सावट नागपूर विद्यापीठाची आज विधिसभा
Just Now!
X