07 August 2020

News Flash

दोन महिन्यांनंतरही चोरांच्या तपासात पोलीस अपयशी

मे महिन्याच्या ७ तारखेला रात्री पोलीस गस्तीवर गेले असताना उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीतच असलेल्या पोलिसांच्या मुद्देमाल कक्षाचे कुलूप तोडून २८ लाख ९४ हजार रुपयांची रोकड

| July 5, 2014 02:15 am

मे महिन्याच्या ७ तारखेला रात्री पोलीस गस्तीवर गेले असताना उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीतच असलेल्या पोलिसांच्या मुद्देमाल कक्षाचे कुलूप तोडून २८ लाख ९४ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेला सोमवारी दोन महिने उलटले असतानाही चोरटय़ांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ते तपास सुरू असल्याची टेप वाजवताना दिसतात.
उरण पोलीस ठाण्याचा मुद्देमाल कक्ष हा पोलीस ठाण्याच्या आवारात आहे. या आवारात पोलीस गार्ड नसल्याचा फायदा घेत ही चोरी झाली आहे. पोलीस ठाण्याच्या नियमानुसार मुद्देमाल कक्षासाठी स्वतंत्र गार्ड नसतो. लॉक अप तसेच शस्त्रागार व मुद्देमाल अशा तिन्ही ठिकाणी एकाच वेळी लक्ष देण्यासाठी एक गार्ड नेमण्यात आल्याने ही घटना घडली आहे. अशा प्रकारची घटना उरण पोलीस ठाण्यात पहिल्यांदाच घडल्याची माहिती न्हावा-शेवा विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली आहे. चोरीला गेलेल्या रकमेपैकी २८ लाख ५० हजार रुपयांची रोकड ही चार महिन्यांपूर्वी नौदलाच्या एका कर्मचाऱ्याने केलेल्या ८१ लाखांच्या रकमेच्या घोटाळ्यातील गुन्हय़ातील होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2014 2:15 am

Web Title: uran police fail to open robbery of 29 lakh
टॅग Robbery
Next Stories
1 ठाणे-बेलापूर महामार्गावरील अंतर्गत रस्ता १७ जुलै रोजी खुला
2 जुळ्या मुंबईलाही पाण्याचे दुखणे
3 नवी मुंबई : पाण्याची श्रीमंती आणि बेफिकीरी..
Just Now!
X