23 October 2020

News Flash

उरणकरांची रेल्वेची प्रतीक्षा कायम

नवी मुंबईच्याच विकासाचा भाग असलेल्या उरण परिसराला जोडणाऱ्या नवी मुंबईतील सीवूड ते उरणदरम्यानची लोकल सुरू करण्यासाठी सिडको आणि रेल्वेच्या माध्यमातून काम सुरू

| June 14, 2014 07:14 am

नवी मुंबईच्याच विकासाचा भाग असलेल्या उरण परिसराला जोडणाऱ्या नवी मुंबईतील सीवूड ते उरणदरम्यानची लोकल सुरू करण्यासाठी सिडको आणि रेल्वेच्या माध्यमातून काम सुरू असून, गेली अनेक वर्षे या रेल्वेमार्गाचे काम रखडलेले असताना सध्या किमान उलवा नोडपर्यंत तरी ही लोकलसेवा सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी २०१४ची मुदत सिडकोकडून देण्यात आलेली आहे. कामाची गती पाहता त्याची शक्यता कमी असल्याने नवी मुंबई ते उरणदरम्यानच्या लोकलला मुहूर्त कधी, असा सवाल आता उरणमधील नागरिकांकडून केला जात आहे.नवी मुंबईचा विकास झपाटय़ाने होऊ लागला आहे. या विकासाने गती घेतल्याने सध्या नवी मुंबईच्या विकासासाठीही सिडकोला जमीन कमी पडू लागलाने सिडकोने आपला विस्तार उरण, पनवेलसल कर्जत, पेणपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या नवी मुंबईचाच एक भाग असलेल्या उरण परिसरात लोकल सुरू करण्याचा सिडकोचा प्रस्ताव गेली अनेक वर्षे रखडला आहे. या रेल्वेमार्गात गव्हाण ते जासईदरम्यानच्या मार्गात येणारी खारफुटी व वनविभागाची जागा यांचा अडथळा असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे सीवूड (नवी मुंबई) ते गव्हाण उलवा नोडदरम्यान रेल्वेचे काम पूर्ण झाले असून, या मार्गावर रेल्वे सुरू करण्याचे सिडकोने जाहीर केले होते. त्याच प्रमाणे जासई ते उरणदरम्यानच्या रेल्वेमार्गाचेही काम प्रगतीपथावर आहे. सिडकोच्या प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या परिसरात येणाऱ्या या मार्गावर भविष्यात मेट्रो सुरू करण्याचाही प्रस्ताव असल्याचे सिडको अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
यापूर्वी नवी मुंबई परिसरात सिडकोने पंचतारांकित अशी रेल्वे स्थानके उभारली आहेत. या स्थानकांवर प्रचंड खर्च होत असल्याने सिडकोने रेल्वेऐवजी मेट्रो प्रस्तावाचाही विचार सुरू केला आहे. त्यामुळे उरण ते नवी मुंबई रेल्वेमार्ग होणार की मेट्रो यापेक्षा सध्या या परिसरातील नागरिकांना दळणवळणाचे साधन उपलब्ध करून देण्याची मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. या संदर्भात सिडकोचे विशेष प्रकल्प अधिकारी सुनील दराडे यांच्याशी संपर्क साधला असता, या संदर्भात वरिष्ठांशी बोला, अशी सूचना करून त्यांनी उत्तर देणे टाळले. या संदर्भात सिडकोचे जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या मार्गावरील मेट्रोची शक्यता नाकारली असून, सेन्ट्रल रेल्वे आणि सिडको यांचा समन्वयाच्या माध्यमातून रेल्वे प्रक्लपाचे काम निर्धारित वेळापत्रकानुसार सुरू असल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 7:14 am

Web Title: urankars still waiting for railway
टॅग Railway,Uran
Next Stories
1 ऐरोलीत रस्त्यावरून चालताना जरा सांभाळून
2 पाहणी दौऱ्यानंतरही नाले तुंबलेलेच
3 ‘आमच्या मनगटात आजही ताकद आहे,’
Just Now!
X