अंत्यसंस्कारासाठी लाकडांचाच वापर केला पाहिजे असे कोणत्याही वेद, पुराण, शास्त्रात लिहिलेले नाही. याउलट गोवऱ्यांचा अंत्यसंस्कारासाठी केलेला वापर हा पवित्र आणि पर्यावरणपुरक आहे. मात्र, आजही भारतात अंत्यसंस्कारासाठी लाखो वृक्षांचा बळी दिला जातो. या प्रथेला सर्वप्रथम कोल्हापूर, सांगली आणि सातारा या ज्ल्ष्टिद्धr(३९)ाांनी फाटा दिला. गोवऱ्यांनी अंत्यसंस्काराची प्रथा सुरू करीत खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षणासाठी प्रत्यक्षात पावले उचलली. आता नागपूर शहरानेसुद्धा या दिशेने वाटचाल सुरूकेली असून, २ जूनला प्रथमच अंत्यसंस्कारासाठी गोवऱ्यांचा वापर करण्यात आला.
पर्यावरण रक्षण हा विषय जागतिक पातळीवर चर्चिला जातो. एवढेच नव्हे तर या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, याच व्यक्तींकडून पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघनही केले जात आहे. वृक्षांच्या कत्तलीवर सारेच बोलतात, पण अंत्यसंस्काराकरिता एका व्यक्तीमागे २० वषार्ंच्या दोन झाडांचा बळी दिला जातो. झाडांच्या या कत्तलीमुळे ऑक्सिजन तयार करणारे आणि शुद्धीकरण करणारे यंत्र गमावल्या जात आहे. त्यावर ‘आपुलकी’ आणि ‘इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशन’ या दोन संस्थांनी पर्याय शोधला आहे. गवळाऊ गाईंनी दूध देणे बंद केल्यानंतर त्या गाईंची रवानगी थेट कत्तलखान्याकडे केली जाते. मात्र, याच गाई-म्हशींकडून शेणाच्या रूपाने उत्पन्नाचा आणखी एक स्त्रोत शिल्लक आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. ‘आपुलकी’चे मनोज महल्ले व त्यांच्या पत्नी यामिनी महल्ले तसेच, ‘इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशन’चे विजय लिमये यांनी वर्धा ज्ल्ष्टिद्धr(३९)ाातील ब्राह्मणवाडा, बोथली, दाणापूर, गुंडमुंड, खुबगाव या पाच गावांमध्ये गोवरी तयार करण्याचा उपक्रम सुरू केला. गवळी बांधवांकडून ६०० ते ७०० रुपये टन याप्रमाणे शेण विकत घेतले जाते. अडीच टनाच्या एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीसाठी १६०० ते १८०० रुपये मोजले जातात. त्यामुळे आठ ते दहा गाई-म्हशींमागे गवळ्यांना चार ते पाच हजार रुपयाची मिळकत प्राप्त होत आहे. एवढेच नव्हे तर कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गाई-म्हशींची रवानगीसुद्धा थांबली आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूर या ज्ल्ष्टिद्धr(३९)ाांत आजही अंत्यसंस्कारासाठी गोवऱ्यांचाच वापर केला जातो. यामुळे या ज्ल्ष्टिद्धr(३९)ाांमध्ये वृक्षतोडीला आळा बसला आहे आणि पर्यावरण रक्षणास हातभार लागला आहे. ‘इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशन’चे विजय लिमये यांनी नागपूरकरांना हे पटवून  देण्यास सुरुवात केली. २ जूनला अंबाझरी घाटावर मृत वत्सला करोडे यांच्यावर एलपीजी दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्यावेळी लिमये यांनी त्यांचे नातू अरुण डोळके यांना गोवऱ्यांचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांनी ते मान्यदेखील केले. गोवऱ्यांची ही व्यवस्था लिमये यांनीच त्यांना करून दिली.

वृक्षतोडीला आळा, पर्यावरणरक्षणास हातभार
नागपुरात दररोज सुमारे ६० व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जातात. त्यासाठी १२० झाडांचा बळी दररोज दिला जातो. गोवऱ्यांनी अंत्यसंस्कार केल्यास एका अंत्यसंस्कारासाठी किमान ५०० ते ७०० गोवऱ्या लागतात. ६० मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी गोवऱ्यांचा वापर केल्यास ३६ हजार गोवऱ्या दररोज लागतील. एक व्यक्ती दिवसाला १५० ते २०० गोवऱ्या बनवू शकतो. त्यामुळे सुमारे २०० लोकांना गोवरीच्या रूपाने रोजगार उपलब्ध होऊ शकतो.