दहावीची परिक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण कसे मिळवावे, त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी,  या विषयी विविध तज्ज्ञ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी-पाचपखाडी मतदार संघातील सावरकरनगरमध्ये माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी ‘लोकसत्ता यशस्वी भव’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सावरकरनगर येथील महापालिका शाळेच्या पटांगणामध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ठाणे महानगर पालिका शाळा क्र. ५, श्रीराम विद्यालय, शिवाजी विद्यालय आणि परिसरातील इतर शाळेतील दहावीचे विद्यार्थी, शिक्षक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ‘लोकसत्ता यशस्वी भव’ उपक्रमाचे शिक्षक अखिल भोसले यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी या विषयाचे मार्गदर्शन केले. तसेच इंग्रजीचा पेपर सोडविताना कोणती काळजी घ्यायला हवी, जेणेकरून जास्तीत जास्त गुण मिळू शकतील, याबाबतही त्यांनी अगदी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शिक्षक मदन बोराटे यांनी गणित, भूमिती आणि विज्ञान, या तीन विषयांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या तिन्ही विषयांमध्ये जास्तीत जास्त गुण कशा पद्धतीने मिळू शकतात, या विषयी सोप्या भाषेत माहिती दिली. तसेच प्रमय, आकृत्या संदर्भात माहिती देऊन त्यांनी गणित आणि भूमिती विषयी विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली.
या कार्यक्रमात दहावीच्या विद्यार्थ्यांनी परिक्षेविषयी असलेल्या शंका तसेच प्रश्न उपस्थित केले. त्यावर दोन्ही शिक्षकांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे मार्गदर्शन केल्याबद्दल दिलीप बारटक्के यांनी उपस्थित शिक्षकांचे आभार मानले.

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…