News Flash

गुलाब महागला!

प्रेम व्यक्त करण्याचे सर्वोत्तम माध्यम गुलाबाचे फूल मानले जाते. अनेक शब्दातून जे व्यक्त होऊ शकणार नाही ते गुलाबाचे एक सुंदर फूल सांगून जाते.

| February 14, 2014 07:27 am

प्रेम व्यक्त करण्याचे सर्वोत्तम माध्यम गुलाबाचे फूल मानले जाते. अनेक शब्दातून जे व्यक्त होऊ शकणार नाही ते गुलाबाचे एक सुंदर फूल सांगून जाते. यामुळेच की काय व्हॅलेटाईनच्या दिवशी बहुतांश प्रेमी त्यांचे प्रेम गुलाबाचे फूल देऊन व्यक्त करीत असतात. गुलाब आणि ‘व्हॅलेंटाईन डे सिलेब्रिशन’ यांचे अतूट नाते आहे. प्रेमवीरांमध्ये गुलाबाची देवाण- घेवाण फारच लोकप्रिय आहे. लाल रंगाच्या गुलाबाला ‘व्हॅलेंटाईन डे’ला अधिक मागणी असते. लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक मानला जातो. तर पांढरा गुलाब शांती व पिवळा गुलाब मित्रत्वाचा प्रतीक मानला जातो. गुलाबाच्या अप्रतिम सौंदर्याने आणि थेट भावनेला हात घालण्याच्या क्षमतेमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून ‘व्हॅलेंटाईन डे’ला गुलाबांची विशेष मागणी असते.
फुलांची मागणी वाढल्याने आज त्याचे दर दहा ते वीस रुपयांनी वाढले आहेत. आज वीस नगाच्या डच गुलाबाचा दर साठ रुपयांपासून ते एकशे तीस रुपयांपर्यंत तर गुलाबगड्डीचा (बारा नग) दर सहा ते दहा रुपये इतका होता. उद्या, शुक्रवारी  ‘व्हॅलेंटाईन डे’ असल्यामुळे गुलाबांच्या फुलांना बाजारात चांगली मागणी होती.  डच गुलाबाला सर्वाधिक मागणी असून लाल गुलाबाला साठ रुपयांपासून एकशे तीस रुपये तर पिवळ्या गुलाबाला पन्नास रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत दर होता. साधी गुलाबगड्डी (१० ते १२ फुले)चा दर ८ ते १५ रुपये इतका होता. बोडरे, ट्रॉजिकल, प्रेसिडेंट, गोल्डन स्ट्राईक अशा वेगवेगळ्या जातींच्या गुलाबांची बाजारात आवक झाली. दोन-तीन आठवडय़ांपासून गुलाबांना चांगला भाव होता. पण, आता व्हॅलेंटाईनमुळे फूल बाजारातील दर दहा ते वीस रुपयांनी वाढले आहेत. मागील वर्षी डच गुलाबाचा दर अडीचशे रुपयांपर्यंत गेला होता. या संदर्भात फूल उत्पादक चिल्लर व ठोक विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय वंजारी यांनी सांगितले, साठ सेंटीमीटर लांबी असलेल्या गुलाबांच्या फुलांना चांगली मागणी आहे. गुलाबाला मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी दहा ते वीस टक्के अधिक दर मिळाला आहे. चाळीस ते पन्नास सेंटीमीटर च्या फुलांनाही चांगली मागणी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 7:27 am

Web Title: valentines day roses cost more
टॅग : Valentines Day
Next Stories
1 व्हॅलेंटाईनच्या डिजिटल अवताराने तरुणाईला भुरळ
2 पाणलोटाने समृद्ध गावाचे मॉडेल!
3 समीर देशमुखांनी गडकरींशी संधान साधल्याने राजकीय वर्तुळाला धक्का
Just Now!
X