शहर व जिल्ह्यात लोकमान्य टिळक यांची जयंती संघटना, संस्था यांच्या वतीने विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. टिळकांच्या कार्याविषयी मार्गदर्शन तसेच गुणवंतांचा गौरव करण्यात आला.शक्ती विकास अकॅडमी नेहरू युवा केंद्र संलग्न शहरातील शक्ती विकास अकॅडमीत आयोजित कार्यक्रमात संस्थेचे संचालक अध्यक्ष मनोहर जगताप यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. जगताप यांनी टिळकांचे जहाल नेतृत्व, सत्यवचन, समाजसुधारणा तसेच ‘स्वराज्य मिळविणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तो मी मिळविणारच’ ही सिंहगर्जना तसेच लोकजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती या उपक्रमांची माहिती दिली. या वेळी जगदीश गांगुर्डे, रवी मोरे, जयंतीभाई पंचमतिया, शशिकांत तांबट आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अकॅडमीचे प्रशिक्षक दीपक जगदाळे यांनी केले. आभार सोनाली भांड यांनी मानले. स्वागत अकॅडमीच्या उपसंचालिका मनीषा जगताप यांनी केले.
जिजाऊ महिला संस्था
गोविंदनगरमधील प्रभाग क्र. ४१ मध्ये नाशिक जिल्हा महिला व बचतगट विकास सहकारी पतसंस्था आणि जिजाऊ महिला सेवाभावी संस्था यांच्या वतीने आयोजित टिळक जयंतीच्या कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा नगरसेविका अश्विनी बोरस्ते, गटसंघटिका दीपाली मुकणे, उषा निंबाळकर, सुरेश पाटील आदी उपस्थित होते. टिळकांनी राष्ट्रीय विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य केल्याचे बोरस्ते यांनी सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी गुरुपुष्यामृत व मेहंदी महिला बचत गटाच्या वैशाली पटेल, कविता बागूल, वैशाली बडे, सुनीता म्हसकर, अक्काबाई मान, पूनम निंबाळकर, प्रतिमा देसले, वैशाली देसले, मोनिका कदम, कांचन परदेशी, अनिता सूर्यवंशी, विद्या चौधरी आदी उपस्थित होत्या.