News Flash

वारकऱ्यांचा मोर्चा

प्रत्येक तालुक्यात वारकरी सांस्कृतिक भवन कार्यालयास जागा मिळावी, अपघातात मरण पावलेल्या वारकऱ्यांच्या वारसांना पाच लाख रूपये मदत मिळावी आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र वारकरी प्रबोधन

| January 22, 2013 12:58 pm

प्रत्येक तालुक्यात वारकरी सांस्कृतिक भवन कार्यालयास जागा मिळावी, अपघातात मरण पावलेल्या वारकऱ्यांच्या वारसांना पाच लाख रूपये मदत मिळावी आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र वारकरी प्रबोधन सेवा मंडळाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. नेहमीच्या मोर्चापेक्षा या मोर्चाचे स्वरूप वेगळे होते. टाळ मृदुंगाच्या गजरात हा मोर्चा निघाला होता.
मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनास सादर केले. अपघातात अनेक वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या मृत वारकऱ्यांच्या वारसांना शासनाने पाच लाख रूपये द्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भारूडकार संगीत विशारद, समाज प्रबोधनकार व कीर्तनकार यांचा विमा उतरविणे, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बाल संस्कार केंद्र निर्माण करणे, तीर्थक्षेत्र प्रदूषणमुक्त ठेवून त्यांची पवित्रता जपणे, गो-हत्या बंदी कायदा लागू करणे या मागण्याही मांडण्यात आल्या. शासनाने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याबाबत वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार कुठल्याही धार्मिक कार्यास तडा जाणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि नंतरच त्या कायद्याची अमलबजावणी करावी, अशी मागणीही वारकरी प्रबोधन मंडळाने केली आहे.
त्र्यंबक रस्त्यावरील गोल्फ क्लब मैदानावरून निघालेला वारकऱ्यांचा मोर्चा नेहमीच्या मोर्चापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. एरवी मोर्चा म्हटला की, वाहनांची कोंडी व घोषणाबाजी हे ठरलेले असते. मात्र, या मोर्चात समस्त वारकरी शिस्तबद्धपणे सहभागी झाले होते. कोणत्याही घोषणा न देता टाळ मृदुंगाच्या गजरात त्यांचा जत्था जिल्हाधिकारी  कार्यालयावर  धडकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 12:58 pm

Web Title: varkari protest at district collector office
Next Stories
1 मोर्चा शिक्षकांचा
2 संनियंत्रण व मूल्यमापनावरही लक्ष
3 नाशिकसाठी आरोग्य संस्थेच्या आराखडय़ात अतिरिक्त पदे मंजूर
Just Now!
X