News Flash

वाहन कर्जातून महाराष्ट्र बँकेची फसवणूक

वाहने खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जाची प्रकरणे तयार करून बँक ऑफ महाराष्ट्र डोंबिवली पूर्व शाखेची ३ कोटी ७७ लाखाची फसवणूक

| May 24, 2014 12:34 pm

वाहने खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जाची प्रकरणे तयार करून बँक ऑफ महाराष्ट्र डोंबिवली पूर्व शाखेची ३ कोटी ७७ लाखाची फसवणूक करणाऱ्या ३८ जणांविरूध्द रामनगर पोलिस ठाण्यात बँकेतर्फे बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन वर्षांपूर्वी संशयीत आरोपींनी बँकेकडून वाहन खरेदीसाठी कर्ज घेतली होती. त्यानंतर त्यांनी कर्जाचे हप्ते फेडण्यास टाळाटाळ सुरू केली. वाहनांसाठी बँकेने दिलेल्या कर्जाची रक्कम वसूल होत नसल्याने बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक बिलन दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. बनावट कागदपत्रांच्या आधारे हे कर्ज मंजूर करून घेतल्याची माहिती पुढे येत आहे. वाहन विक्रेत्याला आरोपींनी कर्जाऊ रकमेचा धनादेश दिला. पण, वाहने खरेदी केली नाहीत. कर्ज घेतल्यानंतर आरटीओची कागदपत्रे, वाहन विक्रेत्याची कागदपत्रे बँकेत जमा करण्यात आली नसल्याचे चौकशी अधिकाऱ्याच्या निदर्शनास आले. आरोपींनी बँकेची फसवणूक केल्यामुळे त्यांच्या विरूध्द बुधवारी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 12:34 pm

Web Title: vehicle loan fraud in bank of maharashtra
टॅग : Bank Of Maharashtra
Next Stories
1 अनास्थेच्या गाळामुळे कल्याणमधील तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर
2 अंबरनाथमध्ये सत्तेसाठी चुरस
3 मजूर संस्थांची ‘दुकाने’ पुन्हा सुरू करण्यासाठी आयुक्तांवर दबाव?
Just Now!
X