परभणी येथे ८ व ९ फेब्रुवारी रोजी १२वे विद्रोही मराठी साहित्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी भाई लक्ष्मणराव गोळेगावकर यांची तर कार्याध्यक्षपदी यशवंत मकरंद यांची निवड करण्यात आल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी दिली.
प्रा. परदेशी म्हणाल्या, आमचे साहित्य आम्ही निर्माण करू आणि ग्रंथकार सभा आम्ही भरवू, अशी आत्मसन्मानाची भूमिका महात्मा जोतिबा फुले यांनी ग्रंथकार सभेच्या निमंत्रणाला उत्तर देताना घेतली होती. उच्चभू प्रस्थापित, सदाशिवपेठी अखिल भारतीय संमेलनावर बहिष्कार टाकून शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, भटके, विमुक्त, अल्पसंख्याक अशा बहुजन स्त्रीपुरुषांचे स्वतंत्र साहित्यसंमेलन आता महाराष्ट्राचा मध्यवर्ती प्रवाह बनत आहे.
या प्रवाहातील १२वे विद्रोही मराठी साहित्यसंमेलन ८ व ९ फेब्रुवारी रोजी परभणी येथे आयोजित करण्यात आले आहे. या विद्रोही मराठी साहित्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई लक्ष्मणराव गोळेगावकर यांची, तर कार्याध्यक्षपदी फुले, आंबेडकरवादी साहित्यिक यशवंत मकरंद यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidrohi marathi sahitya sammelan literature parbhani
First published on: 13-01-2014 at 01:20 IST