News Flash

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विक्रम खेलबुडे

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विक्रम खेलबुडे यांची तर सरचिटणीसपदी राकेश कदम यांची निवड झाली. खजिनदारपदी सुमित वाघमोडे हे निवडले गेले. यावेळी अन्य पदाधिकारी निवडण्यात

| June 11, 2013 01:42 am

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विक्रम खेलबुडे यांची तर सरचिटणीसपदी राकेश कदम यांची निवड झाली. खजिनदारपदी सुमित वाघमोडे हे निवडले गेले. यावेळी अन्य पदाधिकारी निवडण्यात आले.
श्रमिक पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष मनोज व्हटकर यांच्या अध्यक्षतेखाली संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने या पदाकरिता मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी अध्यक्षपदासाठी विक्रम खेलबुडे यांच्यासह शिवाजी सुरवसे, भगवान परळीकर, संजय पवार आदी उमेदवार उतरले होते. गुप्त मतदान होऊन त्यात खेलबुडे व सुरवसे यांना समान म्हणजे प्रत्येकी २४ मते मिळाली. तर परळीकर यांना ९ व संजय पवार यांना ५ याप्रमाणे मते मिळाली. खेलबुडे व सुरवसे यांना समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी काढून निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात खेलबुडे यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना अध्यक्षपद बहाल करण्यात आले.
सरचिटणीसपदी राकेश कदम यांची एकमताने निवड झाली. अन्य पदाधिकारी असे : उपाध्यक्ष विलास जळकोटकर, दीपक शेळके, सचिव-वेणूगोपाळगाडी व बळीराम सर्वगोड, कार्यकारिणी सदस्य: प्रमोद बोडके, रामेश्वर विभुते, अनिल कदम, अजित बिराजदार, महाकाळेश्वर शिंदे, प्रवींद सपकाळ, संजय येऊलकर, विजय पिसे, विनोद कामतकर, वीरेश अंगडी, संताजी शिंदे, शिवकुमार पाटील व विजयकुमार राजापुरे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2013 1:42 am

Web Title: vikram khelbude elected as chairman for solapur union working journalist
Next Stories
1 नद्यांना मारक जलपर्णी निर्मूलनाचे यंत्र अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकडून तयार
2 ‘महावितरण’च्या मृत्युमुखी पडलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी शिवसेनेच्यावतीने निदर्शने
3 बंद घर फोडून १ लाखांचा ऐवज चोरीस
Just Now!
X