20 September 2020

News Flash

विलासरावांचे स्मृतिस्थळ मांजरा काठावर उभारणार

लातूर महापालिकेच्या पुढाकारातून साई येथील मांजरा काठावर दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे भव्य स्मृतिस्थळ उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

| January 24, 2014 01:15 am

लातूर महापालिकेच्या पुढाकारातून साई येथील मांजरा काठावर दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे भव्य स्मृतिस्थळ उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णा काठावर स्मृतिस्थळ आहे. त्या धर्तीवर मांजरा काठावर विलासरावांचे स्मृतिस्थळ उभारले जाणार आहे. महापौर स्मिता खानापुरे यांच्या अध्यक्षतेखाली मनपाची सर्वसाधारण सभा पार पडली. सभेत सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी स्मृतिस्थळ उभारण्यास संमती दर्शविली. राष्ट्रवादीचे नगरसेवक राहुल माकणीकर यांनी हे स्मृतिस्थळ लोकसहभागातून विकसित करावे, अशी मागणी करून त्यासाठी एक लाख रुपयांची देणगीही जाहीर केली.
साई पर्यटनस्थळाच्या काही जागेबाबत असलेला वाद सोडवून पूर्ण जागा अधिग्रहित करावी. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वास्तुशिल्पकाराची नेमणूक करून उत्तम आराखडा तयार केला जाईल व या स्मृतिस्थळासाठी राज्य सरकारकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी बठकीत सांगितले. मकरंद सावे, चंद्रकांत चिकटे, सुनीता चाळक, अॅड. समद पटेल, लक्ष्मण कांबळे आदी नगरसेवकांनी ठराव उचलून धरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2014 1:15 am

Web Title: vilasrao deshmukh place of memory on manjra edge
Next Stories
1 मांजरा परिवाराकडून उसाला दोन हजारांपेक्षा अधिक भाव
2 ग्रंथोत्सवाची संस्कृती रुजत आहे- इंद्रजित भालेराव
3 लातूरला शिशुच्या शरीरात इंजेक्शनची सुई आढळली
Just Now!
X