पेठ तालुक्यातील कळमपाडय़ासारख्या ग्रामीण भागात शहरातील विद्यार्थी ग्राम विकासास कशा प्रकारे मदत करू शकतात हे येथील डॉ. मुंजे इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड काम्प्युटर स्टडीज आणि वनवासी कल्याण आश्रम, वन विभाग यांनी श्रम शिबिराच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.
कळमपाडा येथील शिबीरामध्ये ९० विद्यार्थ्यांसह १३० जणांनी सहभाग घेतला. जिल्ह्य़ातील वनवासी भाग आजही पाण्यापासून वंचित आहे. शहरी भागात दर माणसी पाण्याचा वापरही जास्त केला जातो. नियोजनशून्य आणि अर्निबध वाढीमुळे शहरात पाण्याची कमतरता भासत राहणार आहे. वनवासी भागातील पाणी प्रश्न कोणत्या ना कोणत्या मार्गाने सतत गाजत असतो. परंतु तरीही या प्रश्नांकडे गांभिर्याने बघितले जात नाही. या पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांनी या शिबीराचे आयोजन केले होते. शिबीराची पूर्वतयारी म्हणून आठवडाभर आधी या भागातील समस्या आणि त्यांची उत्तरं या अर्थाने महाविद्यालयात वनवासी कल्याण आश्रमाचे प्रांत संघटन मंत्री संजय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले होते. त्यांनी वनवासींचे देशातील विकासात असलेले योगदान आणि सद्यस्थिती या अनुषंगाने मांडणी केली. संपूर्णपणे विद्यार्थ्यांनी नियोजन केलेला या उपक्रमाचे विद्यार्थी समन्वक म्हणून रोशन शिर्के आणि संजना बोन्दार्डे यांनी काम पाहिले.

Thane district, schools are now tobacco free, health departments, students
ठाणे जिल्ह्यातील ९३६ शाळा तंबाखूमुक्त
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Two minor girls molested in a private tutoring class in nashik
नाशिक : खासगी शिकवणी वर्गात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत