परळी तालुक्यातील नाथ्रा या गावच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या आशा भगवान मुंडे यांची तर उपसरपंचपदी रामेश्वर रघुनाथ मुंडे यांची निवड झाली. परळी तालुक्यातील अन्य १२ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा असल्याचा दावा आमदार धनंजय मुंडे यांनी केला. भाजप बंडखोर अशी बिरुदावली लागलेल्या धनंजय मुंडे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व जागा जिंकून वर्चस्व कायम राखले.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नाथ्राची निवडणुकीत लक्षवेधी ठरली. खासदार गोपीनाथ मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय संघर्षांनंतर मुंडे कुटुंबीयांचे जन्मगाव असलेल्या नाथ्रा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी सर्व जागांवर विजय मिळविला. सरपंचपदी आशा मुंडे व सरपंचपदी रामेश्वर मुंडे यांची एकमताने निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितअण्णा मुंडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. गाढेपिंपळगाव, आचार्यटाकळी, मलनाथपूर, हेळंब, रामेवाडी, पिंपरी, तपोवन, करेवाडी येथेही सरपंच म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती झाल्याचे सांगण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 25, 2012 2:39 am