जिल्ह्यातील विंचूर वाइन पार्कची ओळख राष्ट्रीय पातळीवर होण्यासाठी खुल्या वातावरणात १४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत ‘वाइन व फूड फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी विंचूर येथील १४३ हेक्टरवरील वाइन पार्क सज्ज होत असल्याची माहिती इंडियन ग्रेप प्रोसेसिंग बोर्डाचे अध्यक्ष जगदीश होळकर आणि अखिल भारतीय वाइन उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी आहेर, सचिव राजेश जाधव यांनी दिली.
वाइनचे आकर्षण वाढले असले तरीही वाइनबद्दल पाहिजे तेवढी समाज जागृती अद्याप झालेली नाही. त्याकरिता ऑल इंडिया वाइन असोसिएशन या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत वाइनचे फायदे पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे. या माध्यमातून लोकांना वाइनसंबंधी अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी भारतीय वाइन उत्पादक संघाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, भारतीय पर्यटन विकास महामंडळ, भारतीय कृषी मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, अपेडा, नाबार्ड, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कर्नाटक वाइन बोर्ड, इंडियन वाइन अकादमी आदी अनेक नामांकित संस्थांचे सहकार्य महोत्सवाला लाभले आहे.
या महोत्सवात देशातील तसेच विदेशातीलही पर्यटक आणि वाइन शौकीन उपस्थित राहणार आहेत.
वाइन संदर्भात येथे तज्ज्ञांसोबत चर्चा करता येणार आहे. २०० पेक्षा अधिक कंपन्यांची वाइन, सर्व प्रकारचे द्राक्षे, बेदाणे येथे उपलब्ध राहणार आहेत. याशिवाय योगा व साधना, बँड, पतंगबाजी, चेहऱ्यावरील चित्रकला, पैठणी कक्ष, पारंपरिक संगीत व नृत्य, तंबूत राहण्याची व्यवस्था, वाइन कार्यशाळा व चर्चासत्र, विनीयार्डची सफर, हातमाग वस्तूंचे प्रदर्शन, बैलगाडी फेरी असा अनुभव येथे घेता येणार आहे. वाइन बनविण्याच्या कलेची प्रात्यक्षिकेही दाखविली जातील. वाइन प्रेमींनी या फेस्टिव्हलचा लाभ घ्यावा, असे आवाहन जगदिश होळकर, सचिव राजेश जाधव यांनी केले आहे.

vidarbh economic development marathi news loksatt
तांदळाच्या प्रजातींवर संशोधन संस्थेसाठी ‘वेद’ आग्रही
NIA action in Bangalore blast case two arrested from Kolkata
कोलकात्यातून दोघांना अटक; बंगळूरु बॉम्बस्फोटप्रकरणी ‘एनआयए’ची कारवाई
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
mumbai passengers marathi news, local train marathi news
सुट्टीकालीन लोकल वेळापत्रकाने प्रवासी हैराण, गुड फ्रायडेच्या दिवशी लोकलचा खोळंबा