News Flash

व्होट बँक पॉलिटिक्सचे देशाला घातक’

सध्या व्होट बँक पॉलिटिक्सचे सुरू आहे. हे देशाला घातक असून हिंदूंनी सावध होणे महत्त्वाचे आहे. काश्मीरमध्ये हिंदूंची मंदिरे पाडून मशिदी बांधण्यात आल्या आहेत.

| August 19, 2013 01:47 am

सध्या व्होट बँक पॉलिटिक्सचे सुरू आहे. हे देशाला घातक असून हिंदूंनी सावध होणे महत्त्वाचे आहे. काश्मीरमध्ये हिंदूंची मंदिरे पाडून मशिदी बांधण्यात आल्या आहेत. मुस्लिमांची संख्या वाढत आहे. काही दिवसांत हे मुस्लिम भारताला इस्लाम बनवतील, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केले. माजी स्थायी समिती सभापती सुनील मोदी यांनी लिहिलेल्या ‘मुस्लिम जनसंख्या : एक चिंता’ या पुस्तकाचे समीक्षण व ‘भारतात समान विवाह कायद्याची आवश्यकता’ या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते. केशवराव भोसले नाटय़गृहात लोकमंच चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख विजय देवणे होते.
     मुतालिक म्हणाले, हिंदूंच्या मोठया प्रमाणात हत्याच होत असून आम्ही काय ते बघत बसायचे काय? कितीही खटले दाखल केले तरी आम्ही प्रक्षोभक बोलत राहणार. आम्ही एखाद्या सभेत प्रक्षोभक बोललो, तर आमच्यावर गुन्हे दाखल केले जातात. आतापर्यंत  गुन्हे माझ्यावर असून गुन्ह्यांचे शतक पूर्ण करायचे आहे. नरेंद्र मोदींच्या पाठीशी श्रीराम सेना ठाम असून, ते पंतप्रधान होतील आणि सोनिया गांधी घरी बसतील. समान नागरिकत्वाचा कायदा अस्तित्वात आला पाहिजे. गोहत्या वाढत असून त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी वाढली आहे.
       हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक सुनील घनवड म्हणाले, माहितीचा अधिकार वापरूनच सुनील मोदी यांनी हे पुस्तक लिहिले असून, त्यांच्यावर कोणीच आक्षेप घेऊ शकणार नाही. मुस्लिमांची संख्या वाढू लागल्याने जागोजागी मिनी पाकिस्तान तयार झाले आहेत. हिंदुस्थानात हिंदूंनाच स्थान नाही. बांगलादेशाची घुसखोरी वाढत आहे. हिंदूंना कुटुंब नियोजनाचा कायदा आहे, तर मुस्लिम मोकाट आहेत.
      अध्यक्षीय भाषणात विजय देवणे म्हणाले, वडीलधाऱ्यांनी घालून दिलेली संस्कृतीची जोपासना आपण केली पाहिजे. किती दिवस पाकिस्तानचा हा नंगा नाच बघायचा. येथील सैनिकांचे शिर ते नेणार आणि धड ठेवणार, अशांना ठेचलेच पाहिजे. प्रास्ताविक लेखक सुनील मोदी यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2013 1:47 am

Web Title: vote bank politics is dangerous to country
Next Stories
1 स्थावर मालमत्ता गिळंकृत करणा-या सावकाराला सांगलीत अटक, कोठडी
2 गर्भवती महिलेची पोलीस अधीक्षक, निरीक्षकाविरुद्ध न्यायालयात खासगी फिर्याद
3 विजेचा धक्का लागल्याने कामगाराचा मृत्यू
Just Now!
X