News Flash

काँग्रेसचा बालेकिल्ला भेदण्याचे आव्हान

नायगाव, माटुंगा आणि शिवडी अशा तीन मतदारसंघापासून तयार करण्यात आलेला वडाळा हा दणिक्ष मध्य मुंबईतला मतदारसंघ.

| October 14, 2014 06:04 am

वडाळा
नायगाव, माटुंगा आणि शिवडी अशा तीन मतदारसंघापासून तयार करण्यात आलेला वडाळा हा दणिक्ष मध्य मुंबईतला मतदारसंघ. मराठी लोकसंख्या या मतदारसंघात असली तरी मुस्लिम लोकसंख्याही लक्षणीय आहे. विविध ५२ पोटजातींचा मतदारसंघ म्हणूनही तो ओळखला जातो. अगदी कोरबा मिठागर, बीडीडी चाळीपासून हिंदू कॉलनीसारखा उच्चभ्रू वसाहतींचा परिसर या मतदारसंघात आहे. नायगावचा बराचसा भाग या मतदारसंघात येतो. बीडीडी चाळींच्या दुरूस्तीचा प्रश्न, पोलीस वसाहतींची दुरवस्था, जुन्या चाळींचा रखडलेला विकास, मिठागरांच्या जमिनीचा प्रश्न, स्प्रिंग मिल वसाहतीचा प्रश्न शहरी भागातील गुन्हेगारी या येथील प्रमुख समस्या आहेत वडाळा मतदारसंघात २ लाख ४० हजार मतदार आहेत. कॉंग्रेसचा हा हक्काचा बालेकिल्ला. कालिदास कोळंबकर हे येथून सलग सहावेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पूर्वी ते शिवसेनेत असल्याने हा मतदारसंघ शिवसेनाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र नारायण राणे यांच्यापाठोपाठ कोळंबकर यांनी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देत कॉंग्रसमध्ये प्रवेश केला आणि नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसतर्फे निवडून आले. त्यामुळे या मतदारसंघात सबकुछ कालिदास कोळंबकर असेच चित्र बघायला मिळते. यंदा १४ उमेदवार निवडणुकीच्या िरगणात उतरले आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवेसनेच्या राहुल शेवाळे यांनी या मतदारसंघातून २७ हजार मतांची आघाडी घेतल्याने शिवसेनेला यंदा विजयाची खात्री आहे. मराठी मतदार ५७ टक्के असल्याने आशा अधिकच बळावली आहे. माजी नगरसेवक हेमत डोके यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी या मतदारसंघात नगरसेविका आहेत. मागील निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनतर्फे निवडणूक लढविणाऱ्या प्रमोद पाटील यांनी याच मराठी मतांच्या जोरावर बरीच मजल मारली होती. आता प्रमोद पाटील राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. ३० टक्के मुस्लिम मतेसुद्धा चित्र पालटवू शकतात. भाजपतर्फे मिहिर कोटेचा निवडणुकीच्या िरगणात आहेत.
आमदारकीच्या गेल्या सहा कालखंडात अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. कोरबा मिठागरील झोपडय़ांचा प्रश्न, हेरिटेजचा प्रश्न सोडवलेला आहे. आता बीडीडी चाळींचा प्रश्न लावून धरला आहे. पत्येक घरासाठी साडेचारशे चौरस फुटांच्या घरांची मागणी केलेली आहे.जिंकून येणे माझ्यासाठी महत्वाचे नाही. मी लोकांची सेवा करतच राहणार.
कालिदास कोळंबकर, कॉंग्रेस
उमेदवार
काँग्रेस – कालिदास कोळंबकर *  शिक्षण – दहावी ल्ल  जंगम – ४१ लाख ३५ हजार ७४३ रुपये, स्थावर – १३ लाख ५० हजार
मनसे – आनंद प्रभू ल्ल   शिक्षण – वाणिज्य पदवीधर  *  स्थावर -निरंक  जंगम -४३ लाख ८७ हजार ०६३ रुपये,
शिवसेना – हेमंत डोके *  शिक्षण- जुनी दहावी, ल्ल मालमत्ता स्थावर- निरंक, जंगम- ८० लाख रुपये,
भाजप – मिहिर कोटेचा  *  शिक्षण – ११ वी  ल्ल  स्थावर –  १० कोटी १२ लाख १९हजार ३२६, जंगम –  ५ कोटी ३५ लाख ६५ हजार रुपये
राष्ट्रवादी – प्रमोद पाटील -*  शिक्षण -१२ वी  ल्ल स्थावर – ११ लाख ५० हजार, जंगम -१४ लाख ४७ हजार ७५३ रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 6:04 am

Web Title: voter indicator wadala
Next Stories
1 वांद्रे पूर्व : शिवसेनाच!
2 निवडणूक आयोगाच्या प्रचारसाहित्यात भाषेची मोडतोड
3 तिरका डोळा : आहेत सत्शील तरीही..
Just Now!
X